पुतिन किंवा झेलेन्स्की नाही, एलोन मस्क भडकावू शकतात तिसरे महायुद्ध, एथोस सलोमची धक्कादायक भविष्यवाणी
Elon Musk : आधुनिक काळातील नॉस्ट्राडेमस म्हटल्या जाणार्या एथोस सलोमने यापूर्वीही अशी अनेक भाकिते केली आहेत. त्याची यापूर्वीची अनेक भाकिते खरी ठरली आहेत.
Elon Musk : उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. ट्विटरची खरेदी केल्यापासून तर ते जास्तच चर्चेत आले आहेत. परंतु, यावेळी त्यांचे चर्चेत येण्याचे कारण खूपच वेगळे आहे. आधुनिक काळातील नॉस्ट्राडेमस (भविष्यकार) म्हणवल्या जाणार्या एथोस सलोमे यांनी मस्कबद्दल एक धक्कादायक भाकीत केले आहे. इलॉन मस्क तिसरे महायुद्ध (ww3 could ) भडकावू शकतात असा अंदाज सलोमे यांनी वर्तवला आहे. रशिया तिसरे महायुद्ध सुरू करू शकतो अशी शक्यता सलोमे यांनी वर्तवली आहे. सलोमे याची यापूर्वीची अनेक भाकिते खरी ठरली आहेत.
आधुनिक काळातील नॉस्ट्राडेमस म्हटल्या जाणार्या एथोस सलोमने यापूर्वीही अशी अनेक भाकिते केली आहेत. त्याची यापूर्वीची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता त्यांनी मोबाईल फोनबाबत भाकित केले आहे. मोबाईल फोन संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेईल आणि जो मोबाईल फोनचा जास्त वापर करेल तो देवाच्या विरोधात असेल असे सलोमन याने म्हटले आहे.
सलोमय याने केलेल्या दाव्यानुसार, आगामी काळात एलोन मस्क अँटीख्रिस्ट बनेल आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये युद्ध सुरू होईल. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे पोप पॅट्रिक किरील यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, एक मसिहा विरोधी येईल. त्यानंतर ब्राझिलिलच्या एथोस सलोमे यांनी म्हटलं आहे की, हा मसिहा विरोधी दुसरा तिसरा कोणी नसून एलोन मस्क असेल.
Living Nostradamus : या पूर्वीच्या अनेक गोष्टी ठरल्या खऱ्या
याआधी, एथोस सलोम यांनी राणी एलिझाबेथ ( द्वितीय ) यांचा मृत्यू, एलोन मस्क ट्विटरचे मालक होणार आणि कोरोनाच्या महामारीबाबत अंजात वर्तवला होता. या गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या. याबरोबरच आगामी काळात माणसांची जागा रोबोट्स घेतील असे भाकित देखील सलोमय यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आता जागतिक युद्धाचे भाकित वर्तवले आहे.
सलोन यांनी सांगितले की, वयाच्या 12 व्या वर्षांपासून त्यांना वस्तूंची जाणीव होण्याची ताकद मिळाली आहे. मला माझ्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल जाणीव होते. त्यामुळे मी इतर लोकांपेक्षा वेगळा आहे असे मला वाटले.
महत्वाच्या बातम्या