Leo Horoscope Today 27th March 2023 : सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूवर विजय मिळवता येणार, फक्त 'हे' काम करू नका; आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 27th March 2023 : सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल.
Leo Horoscope Today 27th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन कराराचा फायदा होईल. मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. विवाहित लोक त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी दिसतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डील मिळू शकते.
प्रयत्नांना यश मिळणार
सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळत असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होताना दिसत आहेत.
तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व नातेवाईकांची घरी ये-जा सुरु असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. नाहीतर तुमचे संबंध बिघडू शकतात. नोकरदार वर्गाचे कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. आज जर तुम्ही सर्व काम पूर्ण झोकून आणि मेहनतीने केले तर येणाऱ्या काळात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.
जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. सर्व लोकांना एकत्र पाहून तुमचे मन देखील खूप आनंदी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निवृत्तीमुळे घरात पार्टीचे आयोजन केले जाईल या निमित्ताने नातेवाईकांची ये-जा राहील.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज सिंह राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या ताणामुळे काही काळ विश्रांती घ्यावीशी वाटेल.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :