Janmashtami 2025 : 'असं' करा जन्माष्टमीचं व्रत, भगवान कृष्ण होतील प्रसन्न; प्रेमानंद महाराजांनी सांगितली पूजेची योग्य पद्धत आणि नियम
Janmashtami 2025 : प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे, या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर, तामसिक आहार जसे की कांदा, लसूण आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये.

Janmashtami 2025 : सध्या देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचं (Janmashtami) वातावरण निर्माण झालं आहे. या निमित्ताने भक्तांची खरेदीसाठी जय्यत तयारी तर पाहायला मिळतेच. पण, त्याचबरोबर मंदिरांचीही सजावट केली जातेय. पूजेसाठी लागणाऱ्या सामग्रीची यादी तयार केली जातेय. यंदा 15 ऑगस्ट 2025 रोजी ठिकठिकाणी मंदिरात विशेष पूजा केली जाते. तर, 16 ऑगस्ट रोजी घराघरांत श्री कृष्णाचा जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे.
याच निमित्ताने वृंदावन महाराज यांनी जन्माष्टमीचा उपवास आणि पूा करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे.
'असं' करा जन्माष्टमीचं व्रत
प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे, या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर, तामसिक आहार जसे की कांदा, लसूण आणि मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. हे व्रत करताना देवाबद्दलची आस्था मनात ठेवणं गरजेचं आहे. तसेच, रात्री, 12 नंतरच श्रीकृष्णाच्या जन्मानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा.
पूजेचे नियम
- भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना देवाला नवीन वस्त्र आणि दागिने परिधान करा.
- 108 नामांचा जप करा.
- कृष्ण लीलाच्या कथा ऐका आणि इतरांना देखील ऐकवा.
- घरात कीर्तन तसेच, भजन करावे.
- भगवान श्री कृष्णाला मालपोहे, लोणी आणि तांदळाच्या खीरचा नैवेद्य दाखवावा.
100 एकादशीसमान जन्माष्टमीचा उपवास
हिंदू धर्मशास्त्रानुसार, एकादशीच्या उपवासाला अत्यंत पुण्य मानण्यात आलं आहे. असं म्हणतात 100 एकादशीसमान हे जन्माष्टमीचं व्रत आहे. या दिवशी उपवास ठेवल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते. आणि आपल्याला जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















