India vs New Zealand Final : भारत की न्यूझीलंड? चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल कोण जिंकणार? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार...
India vs New Zealand Final Match Prediction : भारत आणि न्यूझीलंडबरोबर रंगणारा हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज दुपारी 2 वाजता मॅचची सुरु होणार आहे.

India vs New Zealand Final Match Prediction : आज 9 मार्चचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस. खरंतर आजचा दिवस इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. कारण आज चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 ची फायनल मॅच आहे. भारत आणि न्यूझीलंड (Ind Vs Nz) यांच्यात रंगणारा हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज दुपारी 2 वाजता मॅचची सुरुवात होणार आहे. आपण, ज्योतिष शास्त्रानुसार, आज मॅचची नेमकी परिस्थिती कशी असेल? कोणती टीम जिंकण्याची जास्त शक्यता आहे यांसारखेच मॅचच्या संदर्भातील काही भाकितं जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, मॅचच्या संदर्भातील काही भविष्यवाणी...
1. आज मॅचमध्ये जी कोणती टीम पहिली बॅटिंग करेल ती साधारण 250 ते 285 पर्यंत स्कोअर करेल. खरंतर भारतीय संघाने पहिली बॅटिंग करण्याचे योग जुळून आले नाहीयेत. मात्र, जर भारतीय टीम पहिली बॅटिंग करणार असेल तर भारतीय संघाचे दोन फलंदाज 50 च्या वर स्कोअर नक्की करेल. त्यामुळे या परिस्थितीत कोणताही फलंदाज सेंच्युरी करणार नाही.
2. न्यूझीलंडकडून मार्क हेन्री आणि सॅंटनर हे दोघे असे बॉलर आहेत ज्यांच्याकडून भारतीय संघाने सतर्क राहून खेळण्याची गरज आहे. या दोघांपैकी कोणी एक बॉलर 3 पेक्षा जास्त विकेट घेऊ शकतो. या परिस्थितीत न्यूझीलंडची टीमने दुसऱ्या डावात बॅटिंग केली तर ती 50 ओव्हर पूर्ण करु शकणार नाही आणि भारतीय संघ 15 हून जास्त धावांनी मॅच जिंकेल.
3. जर न्यूझीलंडची टीम पहिली बॅटिंग करणार असेल तर त्या संघातून रचिन रविंद्र आणि टी.लाथम हे दोघेही बॅटिंग करण्यासाठी उतरतील. हे दोघेही असे बॅट्समॅन आहेत ज्यांच्यामध्ये शतक करण्याची क्षमता आहे. भारताकडून रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेच बॉलर चांगली कामगिरी करतील. हे दोघे बॉलर मिळून 5 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची शक्यता आहे.
4. अशा परिस्थितीत जर भारतीय टीम दुसऱ्या डावात बॅटिंग करण्यासाठी उतरली तर भारतीय टीमचा एक फलंदाज शतक नक्की करेल.
एकूणच आजचा दिवस भारतीय संघाच्या नावावर असण्याची शक्यता आहे. आणि भारत पुन्हा एकदा ICC चॅम्पियन 2025 ची ट्रॉफी आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















