(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horseshoe Benefits : घोड्याची नाल बदलू शकते तुमचे आयुष्य, जाणून घ्या त्याचे फायदे
Horseshoe Benefits : वास्तूशास्त्रानुसार घोड्याची नाल संकटांचा नाश करणारी मानली जाते. चला तर मग जाणून घेऊया याचे काय फायदे आहेत...
Horseshoe Benefits : बऱ्याच लोकांच्या घराबाहेर म्हणजे मुख्य दरवाज्याच्या चौकटीवर घोड्याची नाल लावलेली दिसते. असं म्हणतात घोड्याची नाल दारावर लावल्याने वाईट नजरेपासून लोकांचे रक्षण होते. यामुळे आपले शत्रूंपासून रक्षण होते, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याची नाल ठेवल्याने घरात नकारात्मक शक्ती येत नाही. मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो. बरेच लोक आपल्या घराच्या आतल्या बाजूला म्हणजेच लिव्हिंग रूममध्ये देखील घोड्याची नाल लावतात.
वास्तूशास्त्रानुसार घोड्याची नाल संकटांचा नाश करणारी मानली जाते. चला तर मग जाणून घेऊया याचे काय फायदे आहेत...
* जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावा. असे केल्याने काही दिवसातच याचा लाभ मिळू लागतो आणि धन मिळण्याचे मार्ग दिसू लागतात.
* जर एखाद्या व्यक्तीला शनिदोषाचा त्रास होत असेल, तर त्याच्या पलंगावर घोड्याची नाल लटकवावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
* ज्यांना शनीची साडेसाती सुरु असेल, त्यांनी घोड्याच्या नालेची अंगठी बोटात घालावी. असे केल्याने शनीच्या प्रकोपाचे वाईट परिणाम दूर होतात.
* वास्तुशास्त्रानुसार ज्यांचा मुख्य दरवाजा उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेला आहे, त्यांनी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लटकवावी.
* काळ्या कपड्यात घोड्याची नाळ बांधून तिजोरीत ठेल्याने धनातही वाढ होते.
* तुमचे काम सतत बिघडत असेल, तर शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालेची अंगठी घाला. त्यामुळे जीवनात प्रगती होते.
* कुटुंबात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी मुख्य दारावर काळ्या घोड्याची U आकारातील नाल लटकवा.
* जर तुमच्या यशाच्या मार्गात ग्रहांचा अडथळा येत असेल, तर काळ्या घोड्याच्या नालेचे ब्रेसलेट घाला, यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
* जर तुम्ही मानसिक तणावाने किंवा नैराश्याने त्रस्त असाल, तर घोड्याच्या नालेची अंगठी घालावी, यामुळे तुम्हाला विशेष फायदा होईल.
* वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार घोड्याच्या नालेची अंगठी घातल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते आणि लोहाची कमतरताही दूर होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :