Horoscope Today, September 26, 2022 : नवरात्रोत्सवाचा पहिलाच दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, September 26, 2022 : मेष राशीच्या लोकांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च टाळावा लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य..
Horoscope Today, September 26, 2022 : आज हस्त नक्षत्र आहे. चंद्र कन्या राशीत आहे. सूर्यही कन्या राशीत असून, शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च टाळावा लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य..
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याच्या तयारी कराल. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊ शकता. आज विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडण्याची सुवर्णसंधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद संभवतो. व्यापार करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा कमावण्याची संधी मिळू शकते. तुमच्या सल्ल्याचे आणि सूचनांचे कुटुंबात स्वागत असेल.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस आनंदाचा आहे. मनातील चिंता कमी होऊन तुम्हाला आराम वाटेल. कामातील सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीही वाढेल. कला आणि साहित्याकडे ओढ वाढेल. कुटुंबातील सर्व सदस्यांशी जवळीक निर्माण जोईल. छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
मिथुन (Gemini Horoscope) : आज आर्थिक लाभ होऊ शकतो. बोलण्यात गोडवा राहील. कामाची व्याप्ती वाढेल. उत्पन्न वाढेल. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. सरकारी कामांमध्ये सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस चिंतेचा असू शकतो. मन अस्वस्थ होऊ शकते. शांत राहून राग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या राजकारण्याला भेटू शकता. कामात व्यस्तता वाढू शकते. नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल. मनात आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देईल. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जे नोकरीत आहेत, त्यांच्या समस्या कमी होतील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. काही नवीन काम मिळू शकते. कोणत्याही आव्हानांना घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्यांचा धैर्याने सामना करू शकाल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस मध्यमा असणार आहे. मनात आशा-निराशेच्या भावना असू शकतात. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबाची साथ मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उत्पन्न वाढेल. संभाषणात संतुलन राखा. व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहील. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. जुन्या मित्रांना भेटू शकता.
तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस लाभदायी असणार आहे. संपत्तीत वाढ होईल. कोर्ट केसेसमध्ये सहज विजय मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यवसायातून फायदा होईल. मुलांनी मिळवलेल्या यशाच्या बातमीने तुम्ही आनंदी व्हाल. काही नवीन काम सुरू करू शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस काहीसा कठीण जाणार आहे. सगळ्या कामांमध्ये नकारात्मकतेचा अनुभव येईल. थकवा आणि आळशीपणामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवेल. मनात थोडी चिंता असू शकते. नोकरी आणि व्यवसायात विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. उच्च अधिकाऱ्यांशी वादात पडू नका. परदेशात राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकांबद्दलची माहिती मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी असणार आहे. मानसिक तणावामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. कामाच्या ठिकाणी ताणतणाव दूर ठेवावा लागेल. अन्यथा इतर काही लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. बोलण्यात सौम्यता ठेवा. घरात सुरु असलेल वाद मिटतील
मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात फायदा होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. शैक्षणिक कार्यात विशेष काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. वडिलांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामात प्रगती होईल.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस काहीसा कठीण जाणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही धीर धरावा लागेल. उच्च अधिकारी तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. मानतील योजना कुणालाही सांगू नका. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात यश मिळेल. तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना आज सुवर्ण संधी मिळू शकते. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कल्पनेत रमणाऱ्या लोकांना आज वास्तविक दुनियेत स्थिरावण्यासाठीचा विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रियजनांचा सहवास मिळाल्याने मनाला आनंद होईल. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कुणाशीही वाद घालू नका. नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची योजना आखू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या