एक्स्प्लोर

Horoscope Today, October 4, 2022 : मेष, सिंहसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंदाचा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 4,  2022 : मेष राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना वादांपासून दूर राहावे लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 4,  2022 : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. तर, सूर्य कन्या राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना वादांपासून दूर राहावे लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज भागीदारीच्या कोणत्याही व्यवसायात नफा मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मित्राच्या मदतीने आज तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. परंतु, काही मित्र तुमचे शत्रू देखील बनू शकतात. आज तुमचे अधिकारी तुमच्या बोलण्याने खूश होतील आणि कार्यक्षेत्रात तुमच्या सूचनांचे कौतुक होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : आज अनैतिक किंवा नियमबाह्य कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. आरोग्यही बिघडू शकते. मनात थोडी चिंता असू शकते. इतरांशी संवाद साधताना विशेष काळजी घ्या. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. नोकरदार लोकांना टार्गेट पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात.

मिथुन (Gemini Horoscope) : आत्मविश्वास कमी होऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभण्याची शक्यता कमी आहे. मनात भावनांचे चढ-उतार असतील. नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी होईल. शासनाकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अधिक धावपळ होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.

कर्क (Cancer Horoscope) : ऑफिसमधील अंतर्गत राजकारणापासून दूर राहा आणि केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामात चुका होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांना विक्रीनुसार मालाचा साठा करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. तरुणाईसाठीही दिवस चांगला जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, एखाद्याची प्रकृती बिघडू शकते.

सिंह (Leo Horoscope) : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील, ज्या फायदेशीर ठरतील. तुमची बोलण्याची शैली इतर लोकांना आकर्षित करेल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नकारात्मकता ओढवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. कोणतेही काम घाई न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.

कन्या (Virgo Horoscope) : आज दिवसभर आळस जाणवेल. मनात चिंता असल्याने कामात रस वाटणार नाही. धनहानी होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामात यश न मिळाल्याने निराशा होऊ शकते. मुलांची चिंता राहील. नियोजित प्रवास पुढे ढकला. दुपारनंतरही हीच स्थिती राहणार आहे. संयमाने वागा. शक्य असल्यास, शांत रहा आणि आराम करा.

तूळ (Libra Horoscope) : आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. एखाद्या कायदेशीर प्रकरणातील वादामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, परंतु तुमची ही समस्या अनुभवी व्यक्तींच्या मदतीने सोडवली जाईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. काही लोक आज घाईघाईत आपल्या जोडीदाराला असे वचन देऊ शकतात, जे पूर्ण करण्यात त्यांना त्रास होईल. निश्चित उत्पन्नामुळे तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आज विचार करण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. जर काही गोष्टींमध्ये बदल करण्याची योजना असेल, तर ही वेळ योग्य आहे. मित्रासोबत प्रवासाची योजना आखाल. काही जुन्या आठवणीही ताज्या होतील. इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणे तुमच्यासाठी चांगले राहील. जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज कोर्टकचेरीपासून दूर राहा. मनात एखाद्या गोष्टीची चिंता असू शकते. तुमच्या नकारात्मक विचारांचा थेट परिणाम कामावर होईल. नोकरदार लोकांना टार्गेट पूर्ण करण्यात काही अडचण येऊ शकते. वाणीवर संयम ठेवा. अपघाताची भीती राहील. दुपारनंतर तब्येत सुधारेल. मनात आनंद राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस चांगला जाणार आहे. जोडीदाराच्या पाठिंब्याने त्यांची बरीच कामे सहज पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तूही आणू शकता. कुटुंबातील आनंददायी वातावरणामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचा तणावही थोडा कमी होईल. एखाद्याची थट्टा मस्करी करणे टाळा. अन्यथा त्याचे वादात रुपांतर होईल.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही एखाद्या धर्मादाय कार्यात व्यस्त असाल. व्यवसायात योग्य नियोजन केल्यास व्यवसाय वाढू शकेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाचे योग आहेत. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदारांना सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराशी तुमचे नाते घट्ट होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget