Horoscope Today, May 8, 2022 : वृषभ, वृश्चिकसह ‘या’ राशींच्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
Horoscope Today, May 8, 2022 : मिथुन, कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारांची साथ लाभणार आहे तर, वृषभ, मिथुन, सिंह राशीच्या लोकांना वाद टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
Horoscope Today, May 8, 2022 : आज चंद्र पुष्य नक्षत्र आणि कर्क राशीत आहे. गुरु आता मीन राशीत आहे आणि सूर्य मेष राशीत आहे. मिथुन, कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारांची साथ लाभणार आहे तर, वृषभ, मिथुन, सिंह राशीच्या लोकांना वाद टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात येऊ शकतो. कोणतेही रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन वाहन खरेदी करणार आहेत त्यांनी काही काळ प्रतीक्षा करणे चांगले ठरेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope) : आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढती किंवा बदलाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक वादांपासून दूर राहा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा. अचानक आर्थिक लाभ होईल.
मिथुन (Gemini Horoscope) : सामाजिक कार्यात मदत करण्याचा विचार कराल. व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास नफा मिळेल. काही महत्त्वाच्या कामासाठी केलेला प्रवास सुखकर होईल. कुटुंबियांशी बोलताना संयम ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. व्यवसायात केलेली गुंतवणूक धनलाभ मिळवून देईल. जोडीदाराशी कोणत्याही समस्येवर चर्चा करू शकता.
कर्क (Cancer Horoscope) : नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. उधार घेतलेले पैसे परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांनी आज आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जोडीदारामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कला आणि संगीतात रुची वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सावध राहा.
सिंह (Leo Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. कामावर लक्ष केंद्रित करा. कामात अडथळे येऊ शकतात. मात्र, मित्रांचे सहकार्य मिळेल. दिवसभरात काही खर्च वाढतील. काम जास्त होईल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. व्यवसायात सामान्य लाभ होईल. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा.
कन्या (Virgo Horoscope) : आज कामात व्यत्यय आल्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जुने वाद मिटतील. नोकरीत प्रगती संभवते. या राशीच्या व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. रागाचा अतिरेक टाळा.
तूळ (Libra Horoscope) : व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अतिरिक्त काम करावे लागू शकते. मनःशांती लाभेल. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम दिसतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यक्षेत्र बदलण्याची शक्यता आहे. कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांनी आज करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नोकरीतील बदलामुळे प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रखडलेले काम आजच पूर्ण करा.
धनु (Sagittarius Horoscope) : नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्र विस्तारेल. कामाची आवक वाढेल. काही जुने मित्र भेटू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता ठेवणे उत्तम राहील. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उधार घेतलेले पैसे मिळू शकतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते.
मकर (Capricorn Horoscope) : एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाणीवर संयम ठेवा, जोडीदाराशी वाद होऊ शकतो. अनावश्यक राग आणि वाद टाळा. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius Horoscope) : कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्यासंबंधी समस्या येऊ शकतात. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मित्रांसोबत प्रवासाची योजना बनवू शकता. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अनावश्यक राग टाळा. सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अनावश्यक धावपळ होईल. मन चंचल राहील.
मीन (Pisces Horoscope) : बाजारात रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. चैनीच्या वस्तू खरेदीकडे कल वाढेल. सहकुटुंब सहलीला जाऊ शकता. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायात आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. शत्रूंपासून सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :