Horoscope Today, June 5, 2022 : ‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात होणार भरपूर फायदा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, June 5, 2022 : मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.
Horoscope Today, June 5, 2022 : आज ज्येष्ठ महिन्याच्या अष्टमीचा दिवस आहे. अआज चंद्र आश्लेषा नक्षत्रात आणि सूर्योदयाच्या वेळी कर्क राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य वृषभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जाणून घेऊया संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामात व्यत्यय आल्याने मानसिक त्रास होऊ शकतो. संयम बाळगण्याची गरज आहे. मनःशांतीसाठी योगा करा. लोकांचे छोटे छोटे विनोदही तुम्हाला त्रासदायक वाटू शकतात. आज घर किंवा जमिनीचे कागदोपत्री काम करू नका. विद्यार्थ्यांसाठी वेळ मध्यम आहे. नोकरदारांनीही आज संयमाने काम पूर्ण करावे.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. मित्र आणि प्रियजनांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. आज तुम्ही गुंतवणुकीच्या योजना करण्यात व्यस्त असाल. दुपारनंतर वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन (Gemini Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायक आहे. आज मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने तुमचे अवघड काम सहज पूर्ण होईल. मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार ठेवले तर कोणतेही काम होणार नाही. व्यवसायात अनुकूल वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कर्क (Cancer Horoscope) : कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन करता येईल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो. भावंडांच्या सहकार्याने धनलाभ होईल. सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकते. वाहन सुख संभवते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होईल. मानसिक चिंताही राहील. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबासोबत हा काळ आनंदात जाईल.
सिंह (Leo Horoscope) : तुमच्या मनात राग आणि उत्कटतेची भावना असेल. लोकांशी काळजीपूर्वक बोला. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ नाही. मनात थोडी चिंता राहील. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो, परंतु दुपारनंतर तुमचे मन प्रसन्न राहील. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
कन्या (Virgo Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या कामावर अधिकारी खुश राहतील. दुपारनंतर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळात पडाल. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका.
तूळ (Libra Horoscope) : तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त असेल. शारीरिक आळस राहील. नोकरीत अधिकारी तुमच्यावर नाराज राहतील. मुलांशी मतभेदही होऊ शकतात. मात्र, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याचे प्रसंगही येतील. आरोग्य चांगले राहील. वडिलांच्या मदतीने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदमय असेल. धार्मिक कार्याकडे कल राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. या राशीच्या अविवाहितांसाठी स्थळ येऊ शकते. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ राहाल. सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. वाणीवर संयम ठेवल्यास परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात.
धनु (Sagittarius Horoscope) : कौटुंबिक वातावरण चांगले राहील. दुपारनंतर तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येत असल्याने तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही. जुनी चिंता पुन्हा त्रास देतील. राग भावना उत्पन्न होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी जास्त वादात पडू नका. अध्यात्म तुम्हाला शांती देईल. कामासोबतच विश्रांतीवरही लक्ष द्या. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी.
मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. कुटुंबात मांगलिक कार्य होऊ शकते. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ आणि मानसन्मान मिळू शकाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रियजनांसोबत राहण्याचा आनंद मिळेल. कामाच्या बाबतीत मात्र चिंतेत राहाल.
कुंभ (Aquarius Horoscope) : तुम्हाला कामात यश मिळेल. यामुळे तुमचे यश वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दुपारनंतर तुम्हाला मनोरंजन आणि खरेदी इत्यादी गोष्टींमध्ये रस राहील. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कुटुंबासह बाहेर जाण्याचा कार्यक्रम आखू शकता. गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळा. व्यवसायात विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे.
मीन (Pisces Horoscope) : आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबासोबत खरेदीला जाता येईल. खर्च वाढल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. नोकरीत प्रगती संभवते. मन प्रसन्न राहील. मित्र किंवा नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकते. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. दुपारनंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :