एक्स्प्लोर

Horoscope Today, June 30, 2022 : वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींच्या नोकरदार वर्गाला होणार फायदा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 30, 2022 : मेष राशीच्या लोकांना विचारांमध्ये झटपट बदल झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेण्यात काही अडचण येईल. तर, वृषभ राशीच्या लोकांचे काम घाईघाईत बिघडू शकते.

Horoscope Today, June 30, 2022 : आज चंद्र मिथुन राशीत आहे आणि पुनर्वसु नक्षत्र आहे. चंद्र संध्याकाळी 06:35 नंतर कर्क राशीत जाईल. सूर्य मिथुन राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना विचारांमध्ये झटपट बदल झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेण्यात काही अडचण येईल. तर, वृषभ राशीच्या लोकांचे काम घाईघाईत बिघडू शकते.

मेष (Aries Horoscope) : विचारांमध्ये झटपट बदल झाल्याने महत्त्वाचे निर्णय घेण्यात काही अडचण येईल. मित्र-मैत्रिणींशी वादात पडू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत संध्याकाळचा वेळ चांगला जाईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ लाभदायक आहे. कामाचा ताण जास्त राहील. वाणीच्या प्रभावामुळे थांबलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायातून उत्पन्न वाढेल. पालकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. मालमत्ता पैसे कमावण्याचे साधन बनू शकते.

वृषभ (Taurus Horoscope) : आज अनेक विचार तुम्हाला त्रास देतील. घाईघाईत तुमचे काम बिघडू शकते. प्रेम जीवन विस्कळीत होईल. नवीन काम, नवीन नाते सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. वादविवाद किंवा चर्चेत तुम्ही हट्टी राहाल. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. भावा-बहिणींमध्ये प्रेम राहील. दुपारनंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. आपले काम काळजीपूर्वक करा, जेणेकरून त्यात कोणतीही चूक होणार नाही. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील आणि मन स्थिर राहील. मित्र आणि प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. अतिरिक्त खर्चावर संयम ठेवा. मनातून नकारात्मक विचार काढून टाका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.

कर्क (Cancer Horoscope) : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. आज तुम्ही कोणत्याही एका निर्णयावर पोहोचू शकणार नाही. गोंधळामुळे मन कुठेही रमणार नाही. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. मित्र-मैत्रिणींशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक कामात पैसा खर्च होईल. आज भांडणापासून दूर राहा. जर, जोडीदाराशी वाद झाला असेल, तर त्याची माफी मागा, अन्यथा भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. विचार न करता काम केल्यास नुकसान होईल.

सिंह (Leo Horoscope) : जास्त वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत घालवाल. आज तुमच्यासाठी निर्णय घेणे थोडे कठीण होऊ शकते. ऑफिसमध्ये जास्त काम असेल. या राशीच्या विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या आयुष्यात चांगला बदल होईल. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला घरी येऊ शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. नोकरीत अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. सावधपणे काम करा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.

कन्या (Virgo Horoscope) : उत्साहावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसाय चांगला राहील. नोकरीत अधिकार वाढू शकतात. जीवनात प्रेम असेल तर खर्च वाढेल आणि जोडीदारासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल.

तूळ (Libra Horoscope) : शुभवार्ता मिळतील. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत सहकारी तुम्हाला साथ देतील. व्यवसायात घाईघाईने वागू नका. इजा आणि अपघात टाळा. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. जर, पैसे कुठेतरी अडकले असतील, तर ते परत देखील मिळतील, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : प्रयत्नांना यश मिळेल. कोणत्याही मोठ्या कामातील अडचणी दूर होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कर्जात घट होईल. समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय सुरळीत चालेल. जोडीदारावरील विश्वास अधिक दृढ होईल. त्यांचे काही बोलणे तुम्हाला खूप प्रभावित करू शकते. नोकरीमध्ये अनुकूलता राहील. गुंतवणूक चांगली होईल. जोखमीची कामे करू नका. नवीन काम आणि नवीन संबंध सुरू करू नका. उत्कटता आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : नवीन मित्र किंवा प्रेम-भागीदारांच्या भेटीमुळे तुम्हाला आनंद मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो, पण बाहेर जाताना काळजी घ्यावी. भागीदारीतून लाभ होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कौटुंबिक जीवनात सुरू असलेले जुने वाद मिटतील. कामात व्यत्यय येईल. नोकरीत उत्पन्न आणि कामाचा ताण कमी होईल. लोक अनावश्यक वादात पडू शकतात. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. आज भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.

मकर (Capricorn Horoscope) : पार्टी आणि पिकनिकचे नियोजन केले जाईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. बौद्धिक कार्य यशस्वी होईल. तुम्हाला एखाद्या ज्ञानी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. सर्वांशी बोलताना आपले वर्तन सौम्य ठेवा आणि गोड बोला. कामांची यादी तयार करून योजना बनवाव्यात. कामात तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले परिणाम देतील. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. एकत्र काम करणारे लोक तुम्हाला साथ देतील. विरोधकांचा पराभव करू शकाल. कायदेशीर बाबींपासून दूर राहावे.

कुंभ (Aquarius Horoscope) : स्थिर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून मोठा फायदा होऊ शकतो. शत्रुत्व निर्माण होईल. भागीदारांचे सहकार्य वेळेवर मिळाल्याने आनंद होईल. नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. गोड वागण्याने कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे आकर्षित होतील आणि ते तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि सर्वजण मिळून कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकतात. विचारांमध्ये स्थिरता नसल्याने कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेणे चांगले ठरेल. प्रवासात अडथळे येऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबतचा राग आणि इतर अडचणींमुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. आज कामाच्या ठिकाणीही तुमचे मन कामात रमणार नाही. बदनामी होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांच्या आरोग्याची चिंता राहील. मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवा. कायदेशीर अडचण दूर झाल्यानंतर परिस्थिती अनुकूल होईल. घाईघाईत पैसा गमावला जाऊ शकतो. व्यवसायात वाढ होईल. प्रत्येकाशी आपले वर्तन चांगले ठेवा आणि कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून दूर राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget