Horoscope Today, July 3, 2022 : मिथुन, तूळसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, July 3, 2022 : कुटुंबियांशी वादामुळे मेष राशीच्या लोकांचे मन चिंताग्रस्त राहील. तर, वृषभ राशीचे लोक विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी होतील.
Horoscope Today, July 3, 2022 : आज आश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशी आहे. सकाळी 06:33नंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. गुरु आपल्या राशीत अर्थात मीन राशीत आहे. कुटुंबियांशी वादामुळे मेष राशीच्या लोकांचे मन चिंताग्रस्त राहील. तर, वृषभ राशीचे लोक विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी होतील. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : कुटुंबियांशी वादामुळे मन चिंताग्रस्त राहील. अनावश्यक आर्थिक खर्च टाळा. आज व्यवसाय आणि नोकरीत सावध राहा. कामाच्या ठिकाणी वेळेवर कामे पूर्ण होण्याच्या शक्यता कमी आहे. प्रवासाचा काही कार्यक्रम असेल, तर आजच पुढे ढकलणे योग्य राहील. कोणत्याही वादग्रस्त चर्चेपासून दूर राहा. आज तुमच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope) : तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे टार्गेट पूर्ण करून तुम्ही अधिकाऱ्याच्या कौतुकास पात्र व्हाल. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला सन्मान मिळेल. दुपारनंतर वादाचे वातावरण राहील. उर्जा कमी होईल. कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद टाळा. वादामुळे बदनामी होऊ शकते, हे लक्षात ठेवा आणि शांत रहा.
मिथुन (Gemini Horoscope) : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. यामुळे तुमचे मन कोणत्याही कामात गुंतून राहणार नाही. अतिरिक्त पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळणार नाहीत. दुपारनंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकाल. आर्थिक लाभही होईल. भावा-बहिणींसोबत प्रेम दुणावेल. भाग्यवृद्धीच्या संधी मिळतील. कामाच्या यशाने तुमचा उत्साह वाढेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क (Cancer Horoscope) : भावनांच्या आहारी जाऊ नका. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. आज तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि तुमचे मनही प्रसन्न राहील. दुपारनंतर कोणतेही काम न झाल्यामुळे वागण्यात चिडचिड राहील. आज कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. जास्त पैसा खर्च होईल. पालकांशी वाद घालणे टाळा. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येणार नाही.
सिंह (Leo Horoscope) : आज तुम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसाल. कौटुंबिक कामात पैसा खर्च होईल. वाणीवर संयम ठेवा. नोकरी किंवा व्यवसायातील अडचण दूर करण्यासाठी ज्येष्ठांची मदत घेता येईल. नातेवाइकांशी मतभेदाचे प्रसंग येतील. दुपारी मित्रांसोबतच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. कामावर नवीन ध्येय देखील मिळू शकते. व्यवसाय आणि नोकरीसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. तरीही शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सुख आणि शांती राहील. व्यापार क्षेत्रातही वातावरण अनुकूल राहील. दुपारनंतर तुमची मनस्थिती अनिश्चित राहील. यामुळे आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात अडथळे येतील. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय घेताना काळजी घ्या. धनहानीबरोबरच मान-सन्मानाचीही हानी होऊ शकते.
तूळ (Libra Horoscope) : कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने वागल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. घराच्या सजावटीतही बदल कराल, यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य येईल. व्यवसायात भागीदाराकडून आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीबाबत योग्य योजना बनवू शकाल. आरोग्यही चांगले राहील. मानसिक शांती लाभेल. मुलांकडून आनंद मिळेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सुख समृद्धीचा दिवस आहे. परदेशातील प्रिय व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक लाभही होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीची संधी आहे. तुमचे प्रत्येक काम यशस्वी, तसेच पूर्ण होईल. आज तुम्हाला जेष्ठांचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात. सन्मान मिळेल. गृहस्थ जीवन आनंदी राहील.
धनु (Sagittarius Horoscope) : आज सकाळी तुमचे आरोग्य नरम राहू शकते. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. वैचारिक पातळीवर संयम बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. व्यवसायात लाभ होईल. मित्र आणि प्रियजनांसोबत वेळ आनंदाने जाईल. प्रवासाचेही योग आहेत.
मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्ही कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद घ्याल. मन प्रसन्न राहील, पण दुपारनंतर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल. जास्त खर्चामुळे पैशांची कमतरता भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अनैतिक कामांपासून दूर राहा. घरगुती जीवनात सुसंवाद राहील. वाहन सावकाश चालवा. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे-पिणे टाळा.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस आनंद आणि शांतीचा असेल. कौटुंबिक जीवनातही आनंद राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. वाहन सुख प्राप्त होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन कपडे आणि दागिन्यांवर पैसा खर्च होईल. सहलीला जाण्याची योजना आखू शकता. जोडीदारासोबत अनेक दिवसांपासून असलेले मतभेद मिटतील. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला लाभ मिळतील.
मीन (Pisces Horoscope) : आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या प्रभावाखाली असाल. कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नका. नवीन कामाची सुरुवात आजपुरती पुढे ढकला. दुपारनंतर परिस्थितीत अचानक सुधारणा होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक गुंतवणुकीसाठी घाई करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :