Horoscope Today, July 27, 2022 : मेष, सिंहसह ‘या’ राशींसाठी दिवस ठरणार लाभदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, July 27, 2022 : मेष राशीच्या लोकांचा सन्मान होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या नोकरदार वर्गावर काही जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो.
Horoscope Today, July 27, 2022 : आज कृतिका नक्षत्र असून चंद्र मिथुन राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचा सन्मान होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या नोकरदार वर्गावर काही जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कोणत्याही व्यक्ती, बँक संस्था किंवा बँक इत्यादींकडून कर्ज घ्यायचे असेल, तर त्यांना ते सहज मिळेल. नवीन कामाची सुरुवात सहज करू शकाल. परंतु, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणे कठीण होईल. लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्या मनातील गोंधळामुळे तुम्ही कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नाही. यामुळे हाती आलेली संधी तुम्ही गमावाल. स्वभावातील हट्टीपणामुळे वाद होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांवर काही जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो. जर तुम्हाला एखाद्या कामात व्यवहार करायचा असेल तर तो मोकळेपणाने करा, नंतर तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळेल.
मिथुन (Gemini Horoscope) : तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. अशा वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती तुम्हाला सतावू शकते. शिक्षणात किंवा कोणत्याही स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे यशाची बातमी मिळाल्याने मुलांना आनंद होईल. कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जुन्या चिंता दूर होऊन आनंद वाटेल.
कर्क (Cancer Horoscope) : शारीरिक आणि मानसिक भीती अनुभवाल. मनातील गोंधळामुळे निर्णय घेणे कठीण होईल. कुटुंबातील व्यक्तींशी वाद झाल्याने दुःख वाढेल. खर्च वाढू शकतो. शक्यतो वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम करताना कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळत असल्याचे दिसते. एखादे जुने आणि महत्त्वाचे काम होऊन आत्मविश्वास वाढेल.
सिंह (Leo Horoscope) : उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. बोलण्यातील संयम तुम्हाला आदर मिळवून देईल. शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल. व्यर्थ धावपळीमुळे त्रास होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. काही लोक त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात पदोन्नती मिळून, उत्पन्न वाढू शकते.
कन्या (Virgo Horoscope) : नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या योजना अंमलात आणाव्या लागतील. व्यवसायात लाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. पगारदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. वडिलांकडून फायदा होईल. कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. कोणत्याही कायदेशीर वादात किंवा खटल्यात विजय मिळू शकतो. कुटुंबातील काही सदस्य तुमच्याकडून काही मागण्या करू शकतात, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल.
तूळ (Libra Horoscope) : आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही मोठी व्यवहाराची समस्या सुटू शकते. हातात पुरेसा पैसा असल्याने तुम्हाला आनंद वाटेल. नवीन मालमत्ता घेण्याची इच्छा पूर्ण होईल आणि संपत्तीतही वाढ होईल. तुमच्या मनात सकारात्मक विचार असतील, ज्याद्वारे तुम्ही इतरांना मदत कराल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज आपल्या स्वभावावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशी विनाकारण वाद होऊ शकतात. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यात बेफिकीर राहू नका. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या मनाप्रमाणे काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे पाहून तुमचे सहकारी नाराज होतील.
धनु (Sagittarius Horoscope) : आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नशिबाच्या मदतीने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. एखाद्या मानागल कार्यात कुटुंबीयांसह सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी असेल. आज नवीन नात्याची सुरुवात देखील होऊ शकते. समाजात मान-सन्मान मिळेल. तर्क आणि बौद्धिक विचारांची देवाणघेवाण करू शकाल. व्यवसायात भागीदारीतून लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.
मकर (Capricorn Horoscope) : व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. पैशाच्या व्यवहारात सहजता येईल. मात्र, कोणालाही कर्ज देणे टाळावे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. आवश्यक कारणांसाठी पैसा खर्च होईल. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले नवीन प्रयत्न फलदायी ठरतील. कर्मचाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. महिलांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तब्येत बिघडू शकते. कोणतीही प्रतिकूल बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. भांडणे व वाद टाळा.
मीन (Pisces Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सन्मान मिळेल, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. वैवाहिक जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद संपुष्टात येतील. नातेवाईकांशी कुठलाही व्यवहार करू नका. संबंध बिघडण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मन अस्वस्थ होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. यामुळे निद्रानाशाचा त्रास होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :