Horoscope Today, July 23, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंदमय! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, July 23, 2022 : मेष राशीच्या लोकांना सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल.
Horoscope Today, July 23, 2022 : आज सूर्य कर्क राशीत आणि चंद्र वृषभ राशीत आहे. आज कृतिका नक्षत्र आहे. गुरू मीन राशीत आहे आणि शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : एखाद्या गोष्टीची चिंता असल्याने कामात मन लागणार नाही. खर्चाच्या चिंतेने मन अस्वस्थ राहू शकते. बोलण्यावर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल. नकारात्मक विचारांमुळे मनाचे नुकसान होऊ शकते. तुमच्यावर कामाचा ताण असू शकतो. काम काळजीपूर्वक करावे लागेल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.
वृषभ (Taurus Horoscope) : कोणतेही काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. कामावर लक्ष केंद्रित करणे तुम्हाला सोपे जाईल. नोकरीच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंद राहील. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात काही अडचणी येत असतील, तर त्याही वरिष्ठ सदस्याच्या मदतीने दूर केल्या जातील.
मिथुन (Gemini Horoscope) : कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल. नोकरी करणारे लोक पार्टटाईम काम करण्याचा विचार करत असतील, तर त्यांना त्यासाठी वेळ काढता येईल. तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. काही शारीरिक वेदनांमुळे मनही अस्वस्थ होईल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Horoscope) : अचानक आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस खूप रोमांचक आणि आनंददायी असेल. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांचे फायदेशीर व्यवहार पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला हवे असलेली काम मिळू शकते. आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळेल. जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना काही सार्वजनिक सेवा करण्याची संधी मिळेल.
सिंह (Leo Horoscope) : तुमच्या दृढ मनोबल आणि पूर्ण आत्मविश्वासाने प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुमची प्रतिभा वाढू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. वडिलांच्या संपत्तीतून लाभ होईल. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. घरात वाद चालू असतील तर ते आज संपतील आणि सुख-शांती नांदेल. दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कन्या (Virgo Horoscope) : मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीमुळे आनंद होईल. मित्रांकडून लाभ होईल. परदेशाशी संबंधित व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. प्रियजनांची बातमी मिळाल्याने आनंद होईल. भाऊ-बहिणीकडून आर्थिक लाभ होईल. नोकरदारांसाठी काळ चांगला आहे. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात बदलाच्या संधीही मिळू शकतात. लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
तूळ (Libra Horoscope) : व्यवसायात वाढ होईल. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. लाभाच्या संधी चालून येतील. आत्मविश्वास वाढेल. कडू बोलण्यामुळे किंवा वाईट वागणुकीमुळे भांडण किंवा वाद होऊ शकतात. रागावर संयम ठेवावा लागेल. गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावे लागेल. चिडचिड होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : नोकरी आणि बिझनेसच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये काही नवीन आणि महत्त्वाचे काम मिळू शकते. यासोबतच मित्र, नातेवाईक आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहेत. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. काही अनपेक्षित खर्च होतील, ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होईल.
धनु (Sagittarius Horoscope) : आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. सहकारी सहकार्य करतील. कामात यश मिळेल. शारीरिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. अनियोजित खर्च वाढतील.
मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग कमी होईल. उच्च अधिकारी किंवा प्रतिस्पर्ध्यांशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार नाही. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. राग आणि वादांचा अतिरेक टाळा. बोलण्यात संयम ठेवा. वैवाहिक सुखात वाढ होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन योजना तयार करू शकता.
कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस आनंदमे आहे. कोर्ट-कचेरीशी संबंधित कामे आज पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत दिवस घालवाल. कार्यक्षेत्रातही काही योजनांच्या माध्यमातून मनाप्रमाणे कमाई होईल. पैसे मिळवण्यासाठी नवीन योजना बनवता येतील. जमीन, घर, वाहन आदी व्यवहारात काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.
मीन (Pisces Horoscope) : महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. कोणताही निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल, अन्यथा नंतर त्रास होईल. नोकरीत बदल होऊ शकतो, उत्पन्नातही वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :