एक्स्प्लोर

Horoscope Today, July 17, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, July 17, 2022 : मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात फायदेशीर परिणाम मिळतील.

Horoscope Today, July 17, 2022 : आज चंद्र शततारका नक्षत्रात आणि कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात फायदेशीर परिणाम मिळतील. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांसंबधित बातमी मिळेल. एखाद्या ठिकाणी बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी दिवस सामान्य आहे. व्यवसायात लाभाची अपेक्षा करू शकता. दिवसाच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने नोकरीत प्रगती शक्य आहे. मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात फायदेशीर परिणाम मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या नात्याला नवे नाव मिळू शते. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला एखाद्या संकटांचा सामना करावा लागेल. आरोग्यात नरम राहील. कोणतेही काम करण्याचा उत्साह कमी होईल. नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्याने निराशा येईल. कोणत्याही प्रकारच्या नवीन कामात सावधगिरी बाळगावी लागेल. आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. पालकांच्या तब्येतीची चिंता वाटेल. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरतील.

कर्क (Cancer Horoscope) : एखाद्या अनैतिक कामापासून दूर राहा आणि विचारांवर संयम ठेवा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती कमकुवत राहील. आज केलेल्या गुंतवणुकीमुळे व्यवसायात चांगला नफा मिळेल. या राशीच्या बेरोजगार तरुणांना नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.

सिंह (Leo Horoscope) : आज तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मित्रांच्या गरजांसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. व्यापार्‍यांना भागीदारांसोबत संयमाने काम करावे लागेल. जास्त वादविवाद तुमचे नुकसान करू शकतात.

कन्या (Virgo Horoscope) : कामात यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील. अधिकारीही तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात विरोधकांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, संयमाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.

तूळ (Libra Horoscope) : शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. सकारात्मक ऊर्जा वाढेल. आज एखाद्या मैत्रिणीच्या मदतीमुळे तुमचे दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. प्रिय व्यक्तीशी झालेली भेट आनंद देईल. कुटुंबातील सदस्यांसोबतही तुमचा दिवस चांगला जाईल. मात्र, अतिविचारांनी मन विचलित होण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक योजना बनवू नका.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आर्थिक नुकसान आणि कामात अपयश येण्याची शक्यता आहे. आज जमीन, मालमत्ता किंवा वाहनासंबंधित व्यवहार करू नका. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वेळ अनुकूल नाही. घरात पाहुण्यांची ये-जा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. या राशीच्या अविवाहित लोकांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. व्यवसायात काही प्रमाणात लाभ मिळू शकतो.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस सामान्य असेल. गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. कामात व्यत्यय आल्याने चिडचिड होऊ शकते. काळजी करू नका, कोणत्याही समस्येचा धैर्याने सामना करा. जोडीदारासोबत प्रत्येक गोष्टीवर चर्चा करा. आज सुरू केलेले काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल. आर्थिक लाभही होऊ शकतो. समाजात प्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तींची भेट होईल.

मकर (Capricorn Horoscope) : बोलण्यावर संयम ठेवल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतील. आज तुम्ही लोकांशी बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे. नोकरीच्या ठिकाणी एखादा जुना वाद पुन्हा निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत किरकोळ मतभेद तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करतील. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope) : कौटुंबिक जीवन आनंदमय होईल. पालकांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. व्यवसायात चांगला पैसा आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. संपूर्ण दिवस आनंदात जाईल. आयुष्यातील महत्त्वाच्या गरजांवर पैसे खर्च करून तुम्हाला आनंद मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामाच्या वाढत्या ताणामुळे चिंतेत राहू शकता. आज धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. कोणाशीही वाद घालू नका. बोलण्यात संयम ठेवा. कोणत्याही नवीन गुंतवणुकीचा लोभ बाळगू नका. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तरुणांना करिअरच्या नवीन संधी मिळतील. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget