एक्स्प्लोर

Horoscope Today, July 15, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today,  July 15, 2022 : मेष राशीच्या व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. वृषभ राशीच्या नोकरदार वर्गाला विशेष लाभ होऊ शकतो.

Horoscope Today,  July 15, 2022 : आज श्रवण नक्षत्र आहे. चंद्र मकर राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. वृषभ राशीच्या नोकरदार वर्गाला विशेष लाभ होऊ शकतो. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्ही घरातील समस्यांकडे जास्त लक्ष द्याल. कुटुंबातील सदस्यांशी बसून महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा कराल. मानसिक आनंद मिळेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळेल. मित्रांकडून आदर मिळू शकतो. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल.

वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायात आर्थिक लाभ होईल. नवीन योजनेवर काम सुरू करू शकाल. लांबचा प्रवास घडू शकतो. नवीन गुंतवणुकीसाठी काळ चांगला आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला विशेष लाभ होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सहज पूर्ण होईल.

मिथुन (Gemini Horoscope) : स्वभावातील आक्रमकतेमुळे तुमचे नुकसान होईल. वाणीवर संयम ठेवल्यास वादविवाद टाळता येतील. खर्च जास्त होईल. दैनंदिन जीवनात आनंद मिळेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यवसायात नफा मिळेल. आज नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. वाहन जपून चालवा. नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

कर्क (Cancer Horoscope) : अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात सामान्य लाभ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमची कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मनात उत्साह राहील. एखाद्या ठिकाणचा प्रवास घडू शकतो. एखाद्या नवीन व्यक्तीसोबतची भेट तुम्हाला आनंद देईल.

सिंह (Leo Horoscope) : मनात काहीशी उदासीनता राहील. घरात सुख-शांती राहील. मनातील विचारांमुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. उच्च अधिकार्‍यांशी वादात किंवा चर्चेच्या भानगडीत पडू नका. अधिक मेहनत करावी लागणार आहे. ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.

कन्या (Virgo Horoscope) : कोणत्याही प्रकारच्या वादापासून किंवा चर्चेपासून दूर राहा. तुमच्या अतितापट स्वभावामुळे वाद होण्याची शक्यता आहे. अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. व्यवसायात विशेष लाभ मिळेल. नोकरदार वर्गाला बढती मिळू शकते. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा व्यवसायाच्या कामात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या

तूळ (Libra Horoscope) : नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी वाद टाळावेत. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. प्रवासासाठी वेळ अनुकूल नाही. कौटुंबिक, मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. सामाजिक कीर्ती प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नफा मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एखादे कर्ज घेणे किंवा देणे टाळा. भांडवल गुंतवताना काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस आनंदी जाईल. एखादे नवीन काम सुरू करू शकाल. कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. ऑफिसमध्येही एखादे नवीन काम सुरू होऊ शकते. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्य सामान्य राहील. वाहने जपून चालवा.

धनु (Sagittarius Horoscope) : विचारांच्या गोंधळामुळे निर्णय घेणे कठीण होईल. मनात थोडी चिंता राहील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने निराशा होईल. व्यवसायात नफा मिळेल. व्यवसायात चुकीचे निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताणही वाढू शकतो.

मकर (Capricorn Horoscope) : नोकरी व्यवसायात तुम्ही प्रगती करू शकाल आणि यश मिळवाल. आज कामाच्या ठिकाणी तुमचे काम लवकर पूर्ण करून, तुम्ही अधिकाऱ्यांकडून कौतुकाचे शब्द ऐकाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात. एखाद्या अपयशाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात सामान्य लाभ होईल. नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा.

कुंभ (Aquarius Horoscope) : पैशाचे व्यवहार आणि स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना खूप काळजी घ्या. पैशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज कोणाकडूनही कर्ज घेणे किंवा देणे टाळावे. व्यवसायात पूर्वीपेक्षा जास्त फायद्याची अपेक्षा करू नका. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा व्यावसायिक भागीदारांसोबत मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भांडवली गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी होणार नाही, याची काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope) : वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांकडून विशेष सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात नफा मिळेल. समाजात तुम्हाला विशेष प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. मित्र आणि वडीलधाऱ्यांची मदत मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget