एक्स्प्लोर

Horoscope Today, August 3, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींना कामात मिळणार मोठं यश! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 3,  2022 : मेष राशीच्या लोकांना बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, त्यामुळे लोक आकर्षित होतील. वृषभ राशीच्या लोकांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल.

Horoscope Today, August 3,  2022 : आज चंद्र कन्या राशीत असून हस्त नक्षत्र आहे. सूर्य कर्क राशीत आणि गुरू मीन राशीत आहे. शनी मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, त्यामुळे लोक आकर्षित होतील. वृषभ राशीच्या लोकांना नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायी असणार आहे. घरात मंगल कार्य आयोजित केले जाऊ शकते. तुम्हाला बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. नोकरीच्या ठिकाणी बुद्धीचा वापर करून अनेक समस्यांमधून सहज बाहेर पडू शकाल. मानसिकदृष्ट्या कामाचा ताण अधिक राहील. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्त मेहनत करावी लागेल.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्या बोलण्याची जादू प्रत्येकाला प्रभावित करेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. बोलण्यातला मवाळपणा नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या लाभामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

मिथुन (Gemini Horoscope) : कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील. नवीन वाहन किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू शकता. जर, घरातील वडिलधाऱ्यांशी कोणत्याही विषयावर वाद झाला असेल, तर तो देखील संपुष्टात येईल. द्विधा मनस्थितीमुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाहीत. मनातील वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थतेचा अनुभव येईल. जास्त भावनिकता तुमचे मनोबल कमकुवत करेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. कौटुंबिक सदस्यांसोबत परस्पर प्रेमपूर्वक संबंध तयार होतील. उत्साहाने प्रत्येक काम पूर्ण कराल. एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुमची भेट घेईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. विरोधकांवर विजय मिळवाल. तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळतील.

सिंह (Leo Horoscope) : कोणत्याही कायदेशीर कामात नक्कीच यश मिळेल. न्यायालयाशी संबंधित प्रकरण प्रलंबित असल्यास, त्यावर निर्णय येईल. गोड बोलणे आणि चातुर्याने कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे एखादे काम सोपवले जाईल, ज्यामुळे तुमचे शत्रू तुमचा हेवा करू शकतात. मनपासून केलेल्या कामात यश मिळेल. नवीन कामाचे नियोजन आणि विचारांचा अतिरेक मनात गोंधळ निर्माण करेल.

कन्या (Virgo Horoscope) : वैचारिकदृष्ट्या तुम्ही समृद्ध राहाल. शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याच्या स्थितीत असाल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा ऐकायला मिळेल. व्यवसायात यश मिळविण्यासाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra Horoscope) : ध्येय साध्य करण्याला तुमचे प्राधान्य असेल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात किंवा बाहेरच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, जी तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणेल. कठोर परिश्रम करून, आपण आतापर्यंत ज्या गोष्टींची कमतरता होती ते सर्व साध्य करू शकता. लग्न किंवा मंगल कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. व्यापार क्षेत्रातही विशेष लाभ होईल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

धनु (Sagittarius Horoscope) : कामात यशाचा दिवस आहे. नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवता येईल. नोकरीत अधिकारी तुमच्या बढतीबाबत चर्चा करू शकतात. घरगुती जीवनात आनंद आणि समाधान राहील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कामाच्या योजना पूर्ण कराल. आपली हुशारी दाखवून तुम्ही घरातील वाद दूर कराल, ज्यामुळे तुमचा तणावही कमी होईल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी पूर्ण जोशाने काम कराल. रखडलेली कामेही पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदार लोकही आपली कामे सहज पूर्ण करू शकतील. साहित्य आणि लेखनाच्या कामांना गती मिळेल. कामाच्या वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. मुलांचे प्रश्न चिंतेचे कारण बनतील. लांबचा प्रवास संभवतो. मात्र, या प्रवासात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : कामाच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील, तर त्यातून सुटका होईल. तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराकडून किंवा मुलांकडून काही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुमची भेट घेऊ शकतो. काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होऊ होईल. एखादे नवीन काम सुरू करण्याची योजना सफल होईल.

मीन (Pisces Horoscope) : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात सहभागी होण्यासाठी हा काळ शुभ आहे. जोडीदारासोबतचे नाते दृढ होईल. कौटुंबिक सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाण्याची शक्ती मिळेल. व्यापारी वर्गाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामातील व्यापामुळे शरीरात थकवा जाणवेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget