एक्स्प्लोर

Horoscope Today 9 May 2024 : आजचा गुरुवार खास! शोभन योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

Horoscope Today 9 May 2024 : ग्रहांच्या चालीनुसार, आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तसेच, कर्क, कन्या राशीला देखील शुभ संकेत मिळतील.

Horoscope Today 9 May 2024 : आज 9 मे 2024, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तसेच, कर्क, कन्या राशीला देखील शुभ संकेत मिळतील. मिथुन राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील.एकूणच सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार (Horoscope Today) कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.

व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. 

तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. 

व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत. 

व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.

आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल. फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. 

व्यापार (Business) - व्यवसायात तुमची प्रगती चांगली असेल. अनेकजण तुमच्या व्यवसायाने प्रभावित होतील. त्यामुळे तुम्हाला अधिक उत्साहित वाटेल. 

तरूण (Youth) - आजचा दिवस तुमचा कुटुंबियांबरोबर आनंदात जाईल. धार्मिक स्थळाला भेट ज्या. मानसिक शांती लाभेल.

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. सर्व निर्णय प्रॅक्टिकल होऊनच घ्या. आयुष्यात पुढे जाल.

व्यापार (Business) - आज तुमच्या व्यवसायातील लोकांशी सामंजस्याने वागा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तरच योग्य व्यवसाय होईल.

तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले तरूण आज मनापासून अभ्यास करतील. आपलं ध्येय लक्षात ठेवून अभ्यास केला तर स्वप्न लवकर साकार होईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत तुमच्या सहकाऱ्यांचा सपोर्ट घ्यायला कोणताच संकोच करू नका. तुम्हाला याचा फायदाच होईल. 

व्यापार (Business) - आज व्यापाराशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकतं. 

तरूण (Youth) - आज तुमचा स्वभाव फारच मूडी असेल. एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणाला दु:खी असाल. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - बुधादित्य योग आणि वृद्धी योग तयार झाल्यामुळे व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. 

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते.

व्यवसाय (Business) - गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मुलांना फोन आणि इंटरनेटवर जास्त सक्रिय होऊ देऊ नका, त्यांना खेळांशी ओळख करून द्या.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. नोकरीत कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

व्यवसाय (Business) - व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमचं मन क्लियर असेल तेव्हाच तुम्ही व्यवसायात ध्येय गाठू शकाल.

कौटुंबिक (Family) - तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस खूप महत्त्वाचा असेल, कारण कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाईम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल.

व्यवसाय (Business) - आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, तुमची आज चांगला कमाई होईल. सणामुळे आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खूप मज्जा कराल, परंतु यासोबत अभ्यासावरही लक्ष द्यावं

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करणं गरजेचं आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget