एक्स्प्लोर

Horoscope Today : वृषभसह मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

आज मंगळवार दिनांक 4 एप्रिल 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 4 April 2023: आज मंगळवार दिनांक 4 एप्रिल 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या राशींच्या लोकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य (Rashibhavishya).

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. बोलताना थोडा संयम ठेवा. वरिष्ठांशी बोलत असताना काळजीपूर्वक बोलणे योग्य ठरेल.


वृषभ 

वृषभ राशीचे जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना उद्या अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण कराल. तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. व्यवसायाशी संबंधित काही मोठे काम होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.बोलताना संयम ठेवा. कोणत्याही वादात पडू नका. आज व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.


कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे. वरिष्ठांकडून काही शुभवार्ता मिळतील. कनिष्ठ आणि वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.  आज अतिरिक्त खर्च होईल. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.


सिंह

सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. सामाजिक जीवनात तुमची उत्सुकता वाढेल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येतील. तुमची रखडलेली कामे एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीनं पूर्ण होतील.


कन्या 

कन्या राशीच्या लोकांना काही नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. छोट्या व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक त्यात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाऊ शकेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दबावामुळं तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोडीदार आणि कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तरुणांना लव्ह लाईफबद्दल आनंद मिळेल. अनोळखी लोकांना व्यवसायात भागीदार बनवू नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. पैसे कसे वाचवायचे ते शिकाल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. 
कामे काळजीपूर्वक करा. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळं काळजी वाटेल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे.  तुम्ही आज शॉपिंग करण्याची शक्यता आहे. 
प्रेमात यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता.

मीन 

मीन राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्ही खूप दिवसांपासून घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत आहात, ते पूर्ण होईल. नवीन वाहना खरेदीची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळं तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget