Horoscope Today 29 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 29 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
![Horoscope Today 29 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य Horoscope Today 29 October 2024 makar kumbha meen aajche rashi bhavishya capricorn aquarius pisces astrological prediction zodiac signs in marathi Horoscope Today 29 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/2cfa8473bd7fecfcf9650529a077bc411720407709040713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Horoscope Today 29 October 2024 : आज 29 ऑक्टोबर म्हणजेच धनत्रयोदशीचा (Dhanteras 2024) दिवस. दिवाळीला सुरुवात झाली असल्या कारणाने आजचा दिवस फार शुभ आहे. आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते. तर, काही राशींना संकटाच सामना करावा लागू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर तुमचे पैसे आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजाच दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो. प्रवासाला जाण्याचे चांगले योग आहेत. प्रॉपर्टी विकत घेताना नीट विचार करुन निर्णय घ्या.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्ही काही बदल करु शकता. आज तुमच्यावर कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात. कोणतंही काम करण्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनिंग करणं गरजेचंआहे. आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष द्या. शेअर मार्केटशी संबंधित तुमचं एखादं नुकसान होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते पैसे तुम्हाला परत मिळम्याची शक्यता आहे. आजच्या दिवसांत तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवल जाऊ शकते. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)