एक्स्प्लोर

Horoscope Today 29 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 29 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पगार मिळेल. या नवीन नोकरीच्या ऑफरमुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, तुमचा व्यवसाय खूप समाधानकारक नफ्यात असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु तुमचे खर्चही तितकेच वाढतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल, परंतु वाईट संगतीतील मित्रांशी कधीही संबंध ठेवू नका, अन्यथा तुम्हीहा चुकीच्या संगतीत पडू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या मंदिरात वैगेरे जाऊ शकता, तिथे तुम्हाला खूप शांती मिळेल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी होऊ शकते.

वृषभ (Taurus Today Horoscope)

आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. त्यांच्याशी चांगलं वागून तुम्ही काम वेळेवर पूर्ण करू शकाल, तुमचे सहकारीही तुम्हाला चांगली साथ देतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात कुठेतरी बाहेर प्रवास करू शकता, जिथे तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकेल. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. आज आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं बहरेल आणि तुमच्या घरातही शांततेचं वातावरण असेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवणार नाही. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. आज कामाचा ताण खूप जास्त असेल, त्यामुळे तुमचा दिवस तणावात जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल, फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. तुमचं सध्या कुठेतरी लफडं सुरू असेल तर तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या लव्ह लाईफबद्दल सांगण्याची हिंमत करू शकता. आज तुमचे तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल. हवामानातील बदलामुळे शारीरिक समस्या जाणवतील. मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी असेल, परंतु तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. काम करताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त रागावू नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन दिवसाच्या शेवटी प्रसन्न राहील. जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या मालाची विक्री कमी झाल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्यांशी किंवा नातेवाईकांशी भांडणं टाळा, अन्यथा तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या मित्रांसोबत फिरण्यात जास्त वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुमचे करिअर घडवण्यावर लक्ष द्या. तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. खोकला, सर्दी, तापाने तुम्ही आजारी पडू शकता.

सिंह (Leo Today Horoscope) 

आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद आज टाळावे, अन्यथा तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे थोडं सावध राहा आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरू शकता, जिथे तुम्ही खूप मजा कराल. मौजमजा करण्यासोबतच तुम्हीही वेळेचे भान ठेवलं तर बरं होईल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कन्या (Virgo Today Horoscope) 

आजचा दिवस चढ-उताराचा असेल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचा बॉस तुमची तुमच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बदली करेल, परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगार मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक गुंतवावे किंवा एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने गुंतवावे. आज अभ्यासावर लक्ष द्या. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुमच्यावर रागावलं असेल तर त्यांना जास्त नाराज न करण्याचा प्रयत्न करा. काही काळानंतर सर्व परिस्थिती सामान्य राहील. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

तूळ रास (Libra Today Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार फलदायक असणार आहे. तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद आज संपुष्टात येतील. आज तुम्हाला तुमच्या नोकरी संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअर संबंधित एखादी चिंता सतावू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार धावपळीचा असणार आहे. तुम्हाला तुमचं काम पूर् करण्यासाठी फार धावपळ करावी लागेल. आजच्या दिवसांत कोणाला दान करु नका किंवा पैसे उधारी देऊ नका. आज तुम्ही तुमच्या करिअर संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, तुम्हाला पुढच्या काही दिवसांत प्रवासाला जाण्याचा योग येऊ शकतो. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची एखाद्या मोठ्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. तुमच्या व्यवसायात जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही करु शकता. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर तुमचे पैसे आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजाच दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो. प्रवासाला जाण्याचे चांगले योग आहेत. प्रॉपर्टी विकत घेताना नीट विचार करुन निर्णय घ्या. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्ही काही बदल करु शकता. आज तुमच्यावर कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात. कोणतंही काम करण्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनिंग करणं गरजेचंआहे.  आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष द्या. शेअर मार्केटशी संबंधित तुमचं एखादं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते पैसे तुम्हाला परत मिळम्याची शक्यता आहे. आजच्या दिवसांत तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवल जाऊ शकते. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                     

Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझाEknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
Embed widget