एक्स्प्लोर

Horoscope Today 27 October 2024 : आज आठवड्याचा शेवटचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 27 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल.  नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये बढाई मारणं, दुसऱ्याला ज्ञान देणं बंद करा, अशाने लोक तुम्हाला अहंकारी समजतील, म्हणून तुम्ही थोडे सावध राहा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध राहावं. आज तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज काहीही साध्य करण्यासाठी परिश्रम हाच एक मार्ग आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप यश मिळवू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज गाडी चालवताना थोडं जपून राहा, अपघात होऊ शकतो, दुखापत होऊ शकते.  

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरदारांनी काम जबाबदारीने काम करावं. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर नातं थोडं तणावाचं असू शकतं. तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धट बोलू नका, तरच नातं नीट चालेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप खर्चाचा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही नको त्या कामात तुमचा वेळ घालवू शकता. गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे खूप अस्वस्थ होऊ शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज आर्थिक बाबतीत दिवस चांगला असेल, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असेल. आज तुमची चांगली कमाई होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जरी रागाच्या भरात काही बोलला तर नंतर माफी मागा. आज लहान मुलांना जास्त त्रास देऊ नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस चांगला असेल, आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आधीच्या चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांना भेटून तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही तुमची पार्टी खूप एन्जॉय कराल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस लाभाचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी सरकारी नियमांचं उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळेल. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल.  

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. सकस आहार घेतला पाहिजे. एखादी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणारे आज कामाचा योग्य प्लॅन बनवतील आणि त्यानुसार काम करतील, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या नवीन ऑफिसमध्ये नुकतेच रुजू झाले असाल तर  तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. जे तुम्हाला तुमच्या भविष्यातही उपयोगी पडेल. 

व्यवसाय (Business) - ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन   व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी योग्य नफा मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल.  

आरोग्य (Health) - कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते सोडून देण्याचा प्रयत्न करा, अन्यथा, त्यामुळे तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता आणि तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)   

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर  तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पद्धतशीरपणे काम केले तर चांगले होईल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या मत्सरी लोकांपासून सावध राहावे, ते  तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

तरुण (Youth) - रुणांनी कुठेतरी रागावणे टाळावे, जास्त राग आल्यास शांत राहावे, तसेच जोडीदारावर विनाकारण रागावणे टाळावे.

आरोग्य (Health) - सर्दी, खोकला, ताप असे जे काही आजार तुमच्या आरोग्याला त्रास देत होते, उद्या तुम्हाला आराम मिळू शकतो.  

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचे बोलणे केवळ टीम लीडरलाच कठोर वाटू शकत नाही तर इतर सहकाऱ्यांनाही दुखवू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. 

व्यवसाय (Business) - छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो. परंतु काळजी करू नका, हळूहळू सर्व परिस्थिती सुधारू शकतs. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सामंजस्याने काम करा, छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण्याऐवजी एकमेकांना साथ द्या

आरोग्य (Health) - महिलांनी खासकरून त्यांच्या केसांची उद्यापासून काळजी घ्यावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या केसांसाठी काही ब्युटी ट्रीटमेंट देखील घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे केस चांगले दिसतील. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते.

आरोग्य (Health) - आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.                                                                         

व्यवसाय (Business) - आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल.  पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल. 

तरूण (Youth) - तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.                                                                             
आरोग्य (Health) -  तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील. तसेच चांगली नोकरीही करतील. 

कुटुंब (Family) - आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. 

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवासाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.

तरूण (Youth) - तरूणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Embed widget