Horoscope Today 27 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार शनिदेवाची कृपा; 'या' लकी राशी कोणत्या? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2024 :
Horoscope Today 27 July 2024 : पंचांगानुसार, आज 27 जुलै 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
एकाच गोष्टीवर चित्त केंद्रित केल्यामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होईल. जुनी आणि वसूल झाल्यामुळे आर्थिक घडी बसण्यासाठी हातभार लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमच्या स्वभावाचा फायदा लोक घेण्याची शक्यता आहे. आचार विचाराच्या बाबतीत थोडा पुरोगामी दृष्टिकोन ठेवाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कुटुंबामध्ये शिस्तीचा बडगा दाखवाल कारण नसताना प्रचंड काळजी करणं सोडा. याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आत्मविश्वासाने उत्सवाचा भाग कमी राहिल्यामुळे नोकरी व्यवसायात त्याचा कामावर परिणाम होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
थोडा एकलकोंडेपणा वाढेल. खूप कष्ट कराल. थोडा हट्टीपणाही वाढणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक. पचन बिघडण्याची शक्यता. महिलांना आपल्या वेळापत्रकात बदल करावा लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
ज्यावर तुमचा पूर्ण विश्वास नाही ते काम हातून नीटपणे पूर्ण होणार नाही. महिलांनी प्रत्येक बाबतीत सतर्क राहावे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आज तुम्ही आत्मविश्वासाने कामाला लागणार आहात. तुमच्यातील निर्मिती क्षमता योग्य तऱ्हेने वापरू शकाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
लेखकांना लिखाण करण्यासाठी स्फूर्तीदायक वातावरण मिळेल आणि पूर्वी जे पेरले असेल ते उगवेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज अनेक लाभ तुमच्या पदरात पडतील. तुमच्या ध्येयाच्या दिशेने जोमाने प्रवास करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुम्ही कोणत्या दिशेने पुढे जात आहात हे महत्त्वाचे ठरणार आहे. खूप महत्त्वाकांक्षा ठेवाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
घरामध्ये थोडे कमी लक्ष दिले गेल्यामुळे घरातील लोकांची चिडचिड होईल आणि वादाचे मुद्दे उपस्थित होतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: