Horoscope Today 26 December 2025 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींना धोक्याची घंटा, तर फक्त 4 राशी सुखात; संध्याकाळच्या वेळी 'हे' कार्य टाळा, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 26 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 26 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यानुसार, भक्त आज देवीची आराधना करतात.उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल.प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. काही विशेष घडणार नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. प्रेम जीवन देखील सामान्य राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















