Horoscope Today 25 May 2024 : आजचा शनिवार 'या' राशींसाठी नुकसानीचा; प्रत्येक कामात राहावं लागणार सतर्क, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 25 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 25 May 2024 : पंचांगानुसार, आज 25 मे 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज नावलौकिक वाढेल. बौद्धिक कामे करायला आवडतील. त्यामध्ये प्रसिद्धी मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
लेखकांना लिखाणात प्रगती करता येईल. करिअरमध्ये विचारांना स्थिरता दिली तर यश मिळवू शकाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
थोडासा आळशीपणा आणि लवकर निर्णय न घेतल्यामुळे नुकसान संभवते. उत्तम संधी मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.
कर्क (Cancer Horoscope Today)
एखाद्या कामासाठी विलंब, अडथळे यांचा सामना करावा लागेल. महिलांच्या गुणांची कदर न झाल्यामुळे थोड्या नाराज होतील.
सिंह (Leo Horoscope Today)
कला-साहित्य आणि सौंदर्य याबाबतीत तुमची कल्पनाशक्ती अफाट काम करेल. महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
कर्तव्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व द्याल. प्रत्येक कामामध्ये अति संवेदनशीलता आणि नाजूक वृत्ती ठेवल्यामुळे इतरांना थोडे मुडी वाटाल.
तूळ (Libra Horoscope Today)
समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रत्येक आव्हानांना सामोरे जाल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज काम आणि वेग यांचे गणित जमवावे लागेल. अंगभूत गुणांचा सदुपयोग करून घ्यावा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
जोडीदाराचे मन राखावे लागेल आणि गैरसमज दूर करावे लागतील. आर्थिक नियोजनांमध्ये तज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील.
मकर (Capricorn Horoscope Today)
हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचा मूड राहील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
मित्र परिवाराशी थोडे वाद संभवतात. अशावेळी रागाचा पारा एकदम चढण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces Horoscope Today)
थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी कामांमध्ये अचानक बदल कराल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: