Horoscope Today 25 July 2025: आजपासून श्रावणाची जबरदस्त सुरूवात, 'या' 4 राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथाचा आशीर्वाद, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 25 July 2025: आजचा शुक्रवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 25 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 जुलै 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आजपासून श्रावण मासारंभ होतोय. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज करिअरच्या बाबतीत थोडासा झगडा संघर्ष करावा लागेल, त्यासाठी कुटुंबातून थोडा विरोध होऊ शकतो
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज उत्तम यश मिळत असतानाही, सतत होणाऱ्या बदलांचे इशारे लक्षात घ्यायला लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज यशासाठी डोळसपणे धोका पत्करणे अपरिहार्य आहे, कोणत्याही टीकेला भीक घालू नका
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचे तारतम्य ठेवायला हवे, नवीन योजनांचे स्वागत करताना संकल्प करा
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज चिकाटी धैर्य यांच्या जोरावर आपलं काम उत्तम असायला हवं असा आत्मविश्वास बाळगा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज दैव कसंही असलं तरी, कर्म तुमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवलेत तर यश तुमचं आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कुळदेवीची उपासना चांगल्या कार्यशक्तीसाठी आवश्यक आहे, त्यामुळे मानसिक ताकद वाढेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आज स्वातंत्र्यप्रियता वाढेल. आज स्वपराक्रमाने समाजात पुढे याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कलासक्त राहाल, पण 'हम करे सो कायदा' हा हेका चालवाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो घरामध्ये आपले म्हणणे इतरांना ऐकवण्यास भाग पाडावे, पाठीच्या कण्याचे आजार उद्भवू शकतात
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कर्तुत्व आणि स्वावलंबन या गुणांमुळे पुढे याल आणि चार लोकात उठून दिसाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज मनमोकळेपणाने लोकांमध्ये मिसळाल. स्वतःच्या अस्तित्वाला धक्का न लावता कामे पूर्ण करा.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: अरे व्वा..श्रावणातला पहिलाच दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! 25 जुलैला ग्रहांचा अद्भूत संगम, भोलेनाथांची कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















