Horoscope Today 24 April 2025 : आजचा गुरुवार 'या' 3 राशींसाठी खास! दत्तगुरुंच्या आशीर्वादाने संकटांपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 24 April 2025 : भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 April 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 24 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरुवार. आजचा वार दत्तगुरुंना समर्पित आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत योग्य संधी मिळाल्या तरी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवायला लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कलाकारांच्या हातून सुंदर कलाकृती निर्माण होती. महिलांनी मात्र आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
व्यवसाय नोकरीत थोडे संघर्षात्मक वातावरण लाभेल सहकारी व्यक्तींशी जुळणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
थोड्या प्रतिकूल परिस्थितीत मनुष्य हरवून बसाल कामाची कितीही घाई असली तरी कायद्यानुसारच मार्गक्रमणा करा.
सिंह रास (Leo Horoscope Today)
वरिष्ठांनी दाखवलेला रुबाब थोडा मागतच पडेल रात्रीचा दिवस करून काम करावे लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
जेवढा लाभ मिळायला हवा तेवढा मिळणार नाही महत्त्वाकांक्षा फार मोठी ठेवाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
आज भरपूर कष्ट करावे लागतील मित्रमंडळींकडून म्हणावे असे सहकार्य मिळणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आधुनिक फॅशनचे कपडे वापरण्याचा मोह होईल महिला नवीन कला शिकतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
बुद्धीच्या कसरती करण्यापेक्षा जास्तीत जास्त काम करून इतरांची मने जिंकाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कोणतेही काम करताना त्याला बौद्धिक बैठक जास्त असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आधुनिक विचारांच्या दिशेकडे वाटचाल होईल हे विचार घरातील मोठ्या लोकांना पटवून द्यावे लागतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















