Horoscope Today 21 May 2025: आज बुधवारचा दिवस 'या' 4 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 21 May 2025: आजचा बुधवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 21 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 मे 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल पचेल आणि पचेल एवढेच खा, नाहीतर पचनशक्ती बिघडेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तेरड्याचा रंग तीन दिवस, या पद्धतीने काम कराल, विशेष म्हणजे असे काम करायला तुम्हालाही खूप आवडेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांना घरात जास्त तडजोड करावी लागेल, काम कमी आणि गाजावाजा जास्त होण्याची शक्यता
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे योग येतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये जरा जास्तच लक्ष घालाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज जेथे मान मिळेल, तिथे काम करण्यास जास्त प्राधान्य द्याल, उच्चपदस्थ लोकांशी संबंध आल्यामुळे आर्थिक प्रश्न सुटून जातील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज धंद्यामध्ये पार्टनरशी जमवून घ्यावे लागेल, कमी वेळामध्ये जास्त काम करण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद चुका कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज वारा येईल तशी पाठ फिरवण्याची तुमची हातोटी उपयोगी पडेल, भाग्याची साथही मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रयत्नांचे महत्त्व अजिबात कमी होऊ देऊ नका, महिलां किरकोळ गोष्टींवरून मानापमान मनाला लावून ठेवतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज दैवत, कर्मणीत अशी काहीशी अवस्था होणार आहे, त्यामुळे थोडी निराशा येईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कुटुंबाबाबत जरा जास्त भावनिक बनाल, अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत अव्यवहारी निर्णय घेतले जातील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महत्त्वाच्या कागदपत्रांवर न बघता सह्या करू नका, आपले सामर्थ्य ओळखून कामाचा आवाका वाढवा.
हेही वाचा :




















