(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 16 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 16 July 2024 : पंचांगानुसार, आज 16 जुलै 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज आलेल्या संधीचा फायदा अवश्य घ्यावा. अतिभावना प्रधानता उपयोगाची ठरणार नाही.
वृषभ (Taurus Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीचा चटका मनावर पगडा बसल्यामुळे काही कामे अविचाराने होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today)
तुमच्या मुडी स्वभावाचे दर्शन लोकांना होईल. परोपकार करण्याचे अनेक प्रसंग शोधून काढाल.
कर्क (Cancer Horoscope Today)
वैवाहिक जीवनात तडजोडीचे वातावरण ठेवावे लागेल. गायन, वादन, कला अवगत असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील.
सिंह (Leo Horoscope Today)
महिलांना कुटुंबात तडजोड करावी लागेल. आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी आज तुम्ही सोडणार नाही.
कन्या (Virgo Horoscope Today)
नोकरी-व्यवसायात कात टाकल्याप्रमाणे पुन्हा एक ओजस्वी व्यक्तिमत्व इतरांना तुमच्यात पाहायला मिळेल.
तूळ (Libra Horoscope Today)
तुमच्या पुढे-मागे तुमचे चाहते घिरट्या घालतील. अशावेळी त्यांना बसायला पाट द्या, पण जेवणाचे ताट मात्र देऊ नका.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
घरामध्ये तुमच्या मतांना किंमत दिली जाईल. पूर्वीचे पेरले असेल ते उगवायला सुरुवात होईल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
प्रत्येक गोष्टीचा विचार पैशाच्या तराजूत तोलून तुम्ही करणार नाही. त्यामुळे तुम्हाला मिळणारे लाभ सुद्धा तुम्हाला मोलाचे वाटतील.
मकर (Capricorn Horoscope Today)
काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावे लागतील आणि त्यातून लाभ होतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आज तुमच्या वागण्यात बिनधास्त पणा दिसेल. आत्मविश्वासाने काम कराल.
मीन (Pisces Horoscope Today)
भाग्याची साथ मिळाल्यामुळे वाढलेली कामे होऊन जातील. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: