एक्स्प्लोर

Horoscope Today 12 May 2024 : आजचा रविवारचा दिवस खास! कर्क, सिंहसह 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभाच्या संधी, वेळोवेळी मिळतील शुभ संकेत; वाचा सर्व 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today 12 May 2024 : आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? एकूणच आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे सर्व 12 राशींचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 

व्यवसाय (Business) - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.

युवक (Youth) - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. 

व्यापार (Business) - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 

तरूण (Youth) - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही यशाची उंची गाठाल. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल जराही हलगर्जीपणा करू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमची तब्येत बिघडू शकते. 

तरूण (Youth) - आज मित्रांचा तुमच्या आयुष्यातील सहभाग फार महत्त्वाचा असणार आहे. मित्राच्या सहकार्याने तुमची अनेक कामे साध्य होतील.

कुटुंब (Family) - वडिलोत्पार्जित संपत्तीवर तुमचा हक्क तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू चांगली राहील. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स पाहून बॉस तुमच्यावर खुश होईल. तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल तर घराबाहेर पडणं टाळा. 

व्यापार (Business) - आज व्यवसायात तुम्ही सतत तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल याचा विचार करत असाल. तुम्हाला यश देखील मिळेल.

तरूण (Youth) - आज जोडीदाराबरोबरचा तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्ही दोघेही भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करू शकता. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही कामात इतके व्यस्त असाल की तुम्हाला वेळेचा पत्ताच लागणार नाही. यामुळे तुम्हाला थकवा देखील जाणवू शकतो.

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल. जर तुम्हाला एखादा आजार असेल तर त्याची औषधं अजिबात चुकवू नका.

व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, जेणेकरून त्यांच्या सहकार्याने व्यवसाय पुढे नेता येईल याचा तुम्ही सतत विचार कराल. 

विद्यार्थी (Students) - विद्यार्थी आपल्या कार्यक्षेत्रात चांगला परफॉर्मन्स देतील. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) -  नोकरी, स्मार्ट वर्कमुळे तुम्हाला MNC कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, ती संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी ठरेल. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, विद्यार्थी आज अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. तुम्हाला फक्त स्मार्टनेस दाखवून अभ्यासाची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. व्यायाम, योगासनं आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक रास ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल.  वैयक्तिक जीवनात आनंदाची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवू शकता. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील, तरीही आरोग्याची काळजी घ्या.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुम्हाला काम समजावून सांगतील. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

व्यवसाय (Business) - तुम्हाला व्यवसायात विशेष काही करता येणार नाही. ग्रहांच्या हालचाली लक्षात घेता, व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

विद्यार्थी (Student) - प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचं वागणं सर्वांना तुमच्याकडे आकर्षित करेल. नोकरदार लोक ऑफिसमधील अवघड कामंही सहज करू शकतील, ज्यामुळे त्यांना पदोन्नती मिळू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या राशीत धृती योग तयार झाल्यामुळे आज व्यावसायिक कामं वेळेवर पूर्ण होतील. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंसाठी दिवस चांगला राहील. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. 

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 12 May 2024 : मेष, मिथुनसह 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, तर 'या' राशींचे सोन्याचे दिवस सुरु होणार; वाचा आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Vastu Tips : हातातून 'या' 5 गोष्टी खाली पडणं पडू शकतं महागात; मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा..वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?
हातातून 'या' 5 गोष्टी खाली पडणं पडू शकतं महागात; मोठ्या संकटांचा असू शकतो इशारा..वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget