एक्स्प्लोर

Horoscope Today 12 March 2024 : आजचा मंगळवार खास! बजरंगबलीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं रााशीभविष्य

Horoscope Today 12 March 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. परंतु काही राशींना आज थोड्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी पाहा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 12 March 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार आज 12 मार्च 2024 मंगळवारचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेवती नक्षत्र, अश्विनी नक्षत्र असेल. याशिवाय आज  वाशी योग, आनंदादि योग, सनफ योग, शुक्ल योग, ब्रह्मयोग यासारखे अतिशय शुभ योग तयार होत आहेत. आज दुपारी 3 ते 4:30 च्या दरम्यान राहू काळ राहील. सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा मंगळवार किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope) जाणून घेऊया.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामातील स्थिती तुमच्या अनुकूल नसल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. सहकारी तुमच्या मागून बरेच गॉसिप्स करतील, तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराशी सुसंवाद ठेवावा. जर तो दूर राहत असेल तर त्याच्याशी फोनवरुन संपर्क साधावा, तरच तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. गुंतवणुकीसाठी थोडं थांबा, घाई करू नका.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, विद्यार्थ्यांचं मन अभ्यासातून विचलित होऊ शकतं, त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त तुमच्या आवडत्या कामांकडेही लक्ष असेल. आज चिडचिड करू नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा. चिडचिड करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस अडचणींनी भरलेला असेल.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, शुक्ल, ब्रह्म योग तयार झाल्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचा स्मार्टनेस दाखवाल. तुमचं काम लक्षात घेऊन तुम्हाला एखाद्या डिपार्टमेंटचं नेतृत्व करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींबाबत जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर ती कोणाशी तरी शेअर करा, ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुमची चिंताही दूर होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्याचा फायदा पाहून घाई करू नका, तुमच्या व्यवसायाकडे नीट लक्ष द्या, अन्यथा नुकसान व्हायला वेळ लागणार नाही.

विद्यार्थी (Student) - ग्रहांची स्थिती लक्षात घेता दिवसभर शारीरिक स्थिती चांगली राहील आणि जुने आजार बरे होतील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, विद्यार्थ्यांना आतापासून मजा करणं थांबवावं लागेल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुमच्या बॉसवर तुमची वेगळीच छाप पडेल. तुमचं काम वेळेत पूर्ण होईल याची विशेष काळजी घ्या.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या शैलीने तुम्ही व्यवसायात नवीन ग्राहक जोडले पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल आणि त्यामुळे तुमचं कर्जही फिटेल.

विद्यार्थी (Student) - ज्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज वाटते, त्यांच्यासाठी हीच वेळ आहे. योग्य असल्यास तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी अर्ज भरू शकता. यश तुमच्या पायाशी असेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस सामान्य असेल. कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज ऑफिसमध्ये अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊन तुमची ऊर्जा वाया घालवू नका, त्यापेक्षा तिचा कामात सकारात्मक वापर करा. नोकरदार लोक सर्व कामं ताकदीने आणि उत्साहाने करू शकतील.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्तरावर तुम्ही सक्षम व्हाल, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारावर विश्वास ठेवून काम करा. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे. एक छोटीसा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा, आपला वेळ वाया घालवू नका. आज तुम्हाला वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची मदत लाभेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अजून प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात अनावश्यक तणाव निर्माण करू नका. व्यवसायाशी संबंधित लोकांनी कामाची अनावश्यक चिंता करणं टाळावं, कारण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले पाहिजे, तरच शरीर निरोगी होऊ शकतं.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कामाच्या ठिकाणी तुम्ही एकसंघता राखाल. ज्या कामामुळे तुम्हाला समाधान मिळते त्या कामांना तुम्ही अधिक महत्त्व किंवा प्राधान्य दिलं पाहिजे. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी ही वेळ चांगली आहे, संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.

विद्यार्थी (Student) - एमबीएच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवावं, अन्यथा तुम्हीही चुकीच्या संगतीत अडकू शकता. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागेल. दुपारनंतर परिस्थिती निवळेल. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरीत सहकाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज शुक्ल योग, ब्रह्मयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, तुम्ही नवीन ठिकाणी आऊटलेट उघडण्याचा विचार करू शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्याबाबत सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला काही कामामध्ये मदत करतील.

व्यवसाय (Business) - व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. जर व्यावसायिक कर्ज घेण्याचा विचार करत असतील तर ते घेऊ शकतात, रोजगाराशी संबंधित कर्ज अधिक चांगलं ठरेल. ग्रहांची स्थिती पाहता संध्याकाळची वेळ व्यापारी वर्गासाठी संमिश्र असणार आहे. तुम्ही ना नफा ना तोटा अशा स्थितीत असाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यासोबत नोट्सही बनवा. स्पोर्ट पर्सन आज त्यांच्या खेळात कठोर मेहनत घेतील.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल एखादा व्यक्ती शंका घेऊ शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कर्ज घेणं व्यावसायिकासाठी अजिबात उचित नाही, कारण कर्जाचा भविष्यावर परिणाम होईल आणि तुमच्या खिशातून अधिकचा पैसा जाईल, यामुळे तुमचा व्यवसाय अडचणीत येईल. शेअर मार्केटमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या, अन्यथा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, शुक्ल, ब्रह्मयोग बनल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी एम्प्लॉयी ऑफ द मंथच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असाल. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक आज सर्व समस्यांवर मात करून पुढे जातील. व्यावसायिक लोकांना आज एखादा नवीन भागीदार मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरदार लोकांनी बॉसच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार रहावं, तुमचा संपूर्ण दिवस बॉसच्या इशाऱ्यावर नाचण्यात जाणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ, बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget