Horoscope Today 12 August 2025: आजचा अंगारक चतुर्थीचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! श्रीगणेश करतील दु:खाचे निवारण, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 12 August 2025: आजचा अंगारक चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 12 ऑगस्ट 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज अंगारक चतुर्थीचा दिवस हा सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नाही त्या गोष्टीवर खल करत बसाल आणि हातात मात्र काहीच पडणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना सहकार्य करण्यासाठी त्याग करण्यासाठी पुढे राहाल, नोकरी व्यवसायात परदेशी कंपन्यांशी संपर्क जास्त येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कलाकारांची कला बहरेल, कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनाचा ठाव घ्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज हातून उत्तम उत्तम कलाकृती निर्माण होतील, परंतु भावनिक स्तरावर फारच हळवे व्हाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांना घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी काम पाहावे लागल्यामुळे तारेवरची कसरत अनुभवतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज स्वाभिमान आणि अहंकार यामधील लक्ष्मण रेषा ओळखावी लागेल, अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालावेसे वाटेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज यंत्रावर काम करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी, नाहीतर छोटे अपघात होण्याची शक्यता आहे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज खूप काम करावेसे वाटले तरी, प्रकृती थोडी नरम गरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आळस सोडावा लागेल अंग झटकून कामाला लागा, बोलण्यामध्ये एकसुरीपणा न ठेवल्यामुळे गोंधळ निर्माण होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवे, महिलांना वैवाहिक जीवनात जोडीदाराची तडजोड करावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज समोर ध्येय उत्तम ठेवले तर अडचणीचे डोंगरही पार कराल, पाठीची दुखणी डोके वर काढतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज सावकाश पण हमखास याच्यावर विश्वास ठेवलात, तर त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे लागेल.
हेही वाचा :
Angaraki Chaturthi 2025: उद्याची अंगारकी चतुर्थी 'या' 5 राशींचे नशीब पालटणारी! अखेर बाप्पाची कृपादृष्टी झालीच, संकटमुक्त व्हाल, सोबत पैसाही येईल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















