Horoscope Today 08 December 2024 : आज रविवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 08 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 08 December 2024 : पंचांगानुसार, आज 08 डिसेंबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
थोड्या थोड्या कारणावरून रागाचा पारा चढू देऊ नका नाहीतर घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
प्रसन्न मन आरोग्य चांगले ठेवायला मदत करेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींवर फार विचार केला नाहीत तर समाधानी राहाल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरी व्यवसायामध्ये मनासारखे काम करायला मिळेल महिलांनी मनःशांतीसाठी उपासना करावी.
सिंह रास (Leo Horoscope Today)
परिस्थितीशी टक्कर देण्याच्या वृत्तीचा तुम्हाला गर्व वाटेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्याशिवाय शांतता मिळणार नाही.
तूळ रास (Libra Horoscope Today)
गुप्त शत्रूंच्या कारवायांना बळी पडण्याची शक्यता आहे व्यवसाय नोकरीत आपण बरे ने आपले काम बरे हा दृष्टिकोन ठेवा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वादाचे प्रसंग आज टाळलेले बरे धंद्यामध्ये स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आपल्या मध्ये काय सुधारणा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आर्थिक बाबतीत कोणतीही गुंतवणूक आज करू नये. यशाची जबरदस्त आसक्ती राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
जिद्दीने कामाला लागल प्रसिद्धीच्या क्षेत्रामध्ये अचानक चढ-उतार झालेले लक्षात येतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधीच्या कामाला गती येईल बरीच कामे मार्गी लागतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: