(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 05 July 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Horoscope Today 05 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्यजाणून घ्या.
Horoscope Today 05 July 2024 : पंचांगानुसार, आज 05 जुलै 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
वाहने जपून चालवा. पित्ताचे विकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
व्यवसाय नोकरीत अचानक घडामोडी घडतील. हाताखालचा स्टाफ एखाद्या वेळी बदलावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
लोकांची मनधरणी करण्यामध्ये बरीच शक्ती खर्च होईल महिलांनी आपली मते स्पष्ट मांडावीत
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज एरवी पेक्षा जरा जास्त व्यवहारी बनाल. घरातील जवळची माणसे लांब प्रवासाला जातील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागला तरी फायदेशीर ठरेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
काम लवकर होऊन आर्थिक फायदा होईल. त्यासाठी आजचे ग्रहमान चांगले आहे
तुळ रास (Libra Horoscope Today)
गप्पा विनोद थट्टा मस्करी करण्यात वेळ घालवाल मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कलाकारांच्या कला विकासाला एक प्रकारची शिस्त असेल .प्रकृतीच्या तक्रारी थोड्याफार जाणवतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा येईल त्यामुळे माणसे जोडली जातील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतल्यामुळे अस्वस्थ राहाल. महिलांचा शब्द घरात प्रमाण मानला जाईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नवीन नोकरीचा कोणताही निर्णय घेऊ नका. प्रकृती बाबत जुनी दुखणी डोके वर काढतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आता खालच्या लोकांच्या ज्यादा मागण्यांचा त्रास होईल कोणताही समझोता करण्यापलीकडची परिस्थिती असल्यामुळे मनावर थोडा ताण येऊ शकतो.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: