Horoscope Today 04 September 2024 : आज 'या' राशींवर राहणार बजरंगबलीची कृपा, अडकलेली कामं लागणार मार्गी; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 04 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 04 September 2024 : पंचांगानुसार, आज 04 सप्टेंबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
दुसऱ्यांच्या योग्य सल्ल्याचा आदर आज तुम्ही निश्चित कराल. पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज तुमच्या बोलण्यात अहंकार जाणवेल. नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज तुमचे विचार इतरांना सादर करण्यात तुम्हाला आनंद वाटेल. दुसऱ्यांना अडीअडचणीच्या काळात मदत कराल.
सिंह (Leo Horoscope Today)
तुमच्या तडफदार स्वभावाला सखोल चिंतनाची साथ मिळेल. कोणतेही काम करताना विचार हातून घडणार नाही याची काळजी घ्या.
कन्या (Virgo Horoscope Today)
महिलांनी आज चुकीचे निर्णय घेऊ नयेत. अति भावनाप्रधानतेमुळे निराशा पदरात पडेल.
तूळ (Libra Horoscope Today)
आज स्वतःच्या कोषातून बाहेर यावे लागेल. नाहीतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
कौटुंबिक स्तरावर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती यासाठी उपयोगी पडेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
संततीकडून थोडा त्रास संभवतो. त्यांच्या आधुनिक विचाराशी जुळवून घ्यावे लागेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
मुलांच्या शिक्षणात अडथळे संभवतात.अति महत्त्वाकांक्षा अविवेकी वागण्याकडे घेऊन जाऊ शकते.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
कधी न येणारा अनुभव आज येऊ शकतो. चारचौघांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती बळावेल.
मीन (Pisces Horoscope Today)
आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागेल. महिलांच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: