Horoscope Today 04 December 2024 : आजचा बुधवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 04 December 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 04 December 2024 : पंचांगानुसार, आज 04 डिसेंबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज तापट स्वभाव सोडावा लागेल. स्वतःच्या कामाकडे जास्त लक्ष द्या.
वृषभ (Taurus Horoscope Today)
मी जिंकू शकतो हा सकारात्मक विचारच तुमच्या कामाला गती देणार आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today)
सर्व उद्दिष्टे साध्य करताना घराकडे मात्र थोडे दुर्लक्ष होईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
चांगल्या विचाराच्या सानिध्यात निराशा येणार नाही, याची खात्री बाळगा. महिलांनी उतावीळपणा करू नये.
सिंह (Leo Horoscope Today)
आज तुमची केलेली स्तुती तुम्हाला सुखावून जाणार आहे. लोक तुमच्याकडून काम करून घेतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ चालतच राहणार आहे. एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून राहील.
तूळ (Libra Horoscope Today)
तुम्हाला मिळालेले यश सर्वांवर मात करेल. मुलांच्या आधुनिक विचारांबरोबर चालणे थोडे अवघड जाईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
जोडीदारावर सर्व निर्णय सोपवलेत तर शांतता मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
परदेशाशी व्यवसाय निमित्त केलेले व्यवहार यशस्वी होतील.
मकर (Capricorn Horoscope Today)
सहकाऱ्यांच्या मदतीमुळे कामाचा फडशा पाडाल. घरगुती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्याल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी आज शॉर्टकट टाळावा. प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घ्यावा.
मीन (Pisces Horoscope Today)
आज उगीचच गप्पा छाटत बसणे तुम्हाला आवडणार नाही. कामाचा स्वाभिमान ठेवाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: