एक्स्प्लोर

Horoscope Today 03 January 2025 : आज विनायक चतुर्थीचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 January 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 03 January 2025 : आज 03 जानेवारी 2025. आज विनायक चतुर्थीचा दिवस आहे. आजचा दिवस गणपतीला समर्पित आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमची समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी भेटीगाठी होतील. या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला थंडीचा त्रासही होऊ शकतो. अशा वेळी योग्य काळजी घ्या. तसेच, सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही नियोजित केलेलं काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची संधी आहे.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव देण्याची चांगली संधी मिळेल. तसेच. आज दिवसभरात तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून आला आहे.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. तसेच, तुम्हाला तुमच्या व्यवसायावर थोडं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात थोडेसे वैचारिक मतभेद होतील. मात्र, तुम्ही यावेळी शांत राहावं. मोठ्यांच्या भांडणात पडू नये. लवकरच तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडू शकते. त्यासाठी स्वत:ला सक्षम ठेवा.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच, विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल. आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. कामानिमित्त तुमची ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.  

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित फलदायी स्वरुपाचा असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मानसिक ताण घेऊ नका. आज तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांमधून बोध घेण्याची गरज आहे.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, व्यवसायाच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. कोणाशीही पैशांचा व्यवहार करताना सावध राहा.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गणपती बाप्पाचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. तसेच, तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्ही बोध घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. निरोगी जीवनशैली जगा.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या बिझनेसचा विस्तार अधिक कसा करता येईल याकडे भर दिला पाहिजे. तसेच, समाजिक कार्यात तुम्ही व्यस्त असाल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)              

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चिंताजनक असणार आहे. सकाळपासूनच तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमणार नाही. अशा वेळी गणपतीच्या मंत्राचा जप करा आणि थोडा वेळ ध्यान करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, संध्याकाळच्या वेळी तुमची तुमच्या मित्रांबरोबर भेटीगाठी होतील. अशा वेळी तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आज तुम्हाला पैशांची गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. तसेच आजच्या दिवशी कोणताच महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. मानसिक शांततेतसाठी रोज योग, व्यायाम आणि ध्यान करावं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 03 January 2025 : आजचा शुक्रवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP MajhaTop 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Embed widget