Horoscope Today 03 January 2025 : आजचा शुक्रवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 03 January 2025 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 03 January 2025 : पंचांगानुसार, आज 03 जानेवारी 2025, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
दुसऱ्यांबद्दल सहकार्याची भावना ठेवाल. सामाजिक कार्यात रस घ्याल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
गैरसमज आणि वितांडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
लांबच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राखण्यात यशस्वी व्हाल.
कर्क (Cancer Horoscope Today)
तुमच्या कामातील कौशल्याचा बऱ्याच जणांना फायदा होईल.
सिंह (Leo Horoscope Today)
ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवून काम करावे लागेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
स्वतःचा अनुभव सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका.
तूळ (Libra Horoscope Today)
यश मिळेल पण ते टिकवणेही अवघड आहे, याची जाण येईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
नव्या उमेदीने कामाला लागाल. महिलांनी आपली अभ्यासू वृत्ती जागृत ठेवावी.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज सहनशक्ती वाढेल. एखादी उपासना करत असाल त्याचा फायदा होईल.
मकर (Capricorn Horoscope Today)
आज भरपूर काम कराल. परंतु तेवढेच संवेदनक्षमही बनाल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.
मीन (Pisces Horoscope Today)
कोणत्याही तणावाला बळी न पडता कामाचे योग्य नियोजन करा.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: