Hindu Religion: अंत्यसंस्कार करून परतताना मागे वळून का पाहत नाही? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल, गरुडपुराणात म्हटलंय...
Garud Puran: अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नाही. गरुड पुराणात याचा उल्लेख आहे. नेमकं काय म्हटलंय?
Garud Puran: हे तर विधीचं विधान आहे, हा निसर्गाचा नियम आहे, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका नाही, जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल, त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि यालाच जीवनाचे सत्य म्हणतात. हिंदू धर्मात एकूण 16 संस्कारांचे वर्णन आहे, त्यापैकी 16 वा अंतिम संस्कार आहे. या विधींचे अनेक नियम आहेत, यातील एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नाही. गरुड पुराणात याचा नेमका काय उल्लेख आहे? काय सांगतात ज्योतिषतज्ज्ञ..
हिंदू धर्मात अंत्यसंस्कार विधींचे अनेक नियम
हिंदू धर्मात म्हटले जाते की, मृत्यूनंतर मानवी आत्मा ईश्वरात विलीन होतो. पण तरीही मृत्यूनंतर अनेक विधी केले जातात. हिंदू धर्मात अंत्यसंस्कार विधींचे अनेक नियम आहेत, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाणारे लोक अज्ञानामुळे किंवा अनावधानाने कधीही करू नयेत अशा गोष्टी करतात. यातील एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नाही. गरुड पुराणात याचा उल्लेख आहे. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
...पण आत्मा इथेच राहतो?
गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो. अंत्यसंस्कारानंतर देह जाळला जातो, पण आत्मा तिथेच राहतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, आत्मा अमर, शाश्वत आणि अविनाशी आहे. कोणतेही शस्त्र आत्म्याला मारू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि पाणी त्याला बुडू शकत नाही.
आत्म्याची कुटुंबाप्रती असलेली ओढ
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेले जाते. असे म्हणतात की या संस्कारानंतर आत्मा दुसऱ्या जगात जातो. परंतु जेव्हा कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात, तेव्हा आत्म्याचे कुटुंबाप्रती असलेली ओढ त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून रोखते. मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी 13 दिवस अनेक विधी केले जातात.
आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो
गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो. स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित असल्याने त्यांनाही त्यांच्याविषयी ओढ असते. अशावेळी, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा तो तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुमचे त्याच्याशी असलेले नाते तुटू शकत नाही. अशावेळी आत्म्याला परलोकात जाण्यात अडचण येते, म्हणून अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये असे सांगितले जाते.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )