Guru Pushyamrut Yog 2023 : आज गुरुपुष्यामृत योग! शुभ खरेदीचा महामुहूर्त; जाणून घ्या पूजा, तिथी आणि महत्व
Guru Pushyamrut Yog 2023 : यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात.

Guru Pushyamrut Yog 2023 : आज गुरु पुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yog 2023) आहे. प्रत्येक वर्षाची काहीतरी वैशिष्ट्य असतात. मराठी 'शोभन नाम संवत्सर' या नवीन वर्षाबाबत जर बोलायचं झालं तर यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. आजचा गुरु पुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात.
पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी उपाधी देण्यात आली आहे. या दिवशी सुरु केलेल्या कामात चांगलं फळ प्राप्त होतं अशी मान्यता आहे. या नक्षत्रात केलेल्या कार्यात स्थायित्तव भाव असतो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून लवकर बदल होऊ नये अशी कामं या दिवशी केली जातात.
गुरुपुष्यामृत योग तिथी आणि मुहूर्त
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुपुष्यामृत योग आज म्हणजेच 27 एप्रिल 2023 रोजी आहे. गुरुपुष्यामृत योग सकाळी 06.58 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 06.15 पर्यंत म्हणजेच सूर्योदयापर्यंत असेल.
गुरुपुष्य योगाचे महत्त्व
गुरुवारी हा श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे. गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास सुख, वैभव आणि संपत्ती प्राप्त होते. अशी मान्यता अनेक वर्षांपासूनची आहे.
पुष्य नक्षत्राचे महत्त्व
बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रात झाला. तैत्रिय ब्राह्मणात असे म्हटले आहे की, बृहस्पती प्रथम जयमनः तिष्यम् नक्षत्र अभिसं बभूव.. नारद पुराणानुसार या नक्षत्रात जन्मलेला व्यक्ती बलवान, दयाळू, धार्मिक, धनवान, विविध कलांचा जाणकार, दयाळू आणि सत्यवादी असतो. सुरुवातीपासून या नक्षत्रात केलेली सर्व कर्मे शुभ मानली जातात, परंतु देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणिग्रहण विधींसाठी वर्ज्य मानले जाते.
गुरुपुष्य योगात करण्याचे उपाय
महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी नारायणांची पूजा करा. पूजेमध्ये 'ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:' या मंत्राने 108 वेळा जप करा.
या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखची पूजा करा.
या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. तर नोकरदार वर्गांनी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करा.
गुरु पुष्य योगात एकाक्षी नारळाची पूजा करा.
गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे चमत्कारीक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
