Guru Pushya Yog : 2024 चा शेवटचा गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार वरदान; मिळतील अचानक धनलाभाचे संकेत
Guru Pushya Yog 2024 : ग्रहांच्या हालचालींनुसार तसेच, अनेक शुभ योगाबरोबरच आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे.
Guru Pushya Yog 2024 : हिंदू धर्मग्रंथानुसार, आज गुरुवारचा दिवस म्हणजेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 04 मिनिटांपर्यंत राहील. तर शुक्ल योग (Yog) दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपर्यंत जुळून येईल. पुष्य नक्षत्र आज दुपारी 3 वाजून 36 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच गुरुवारी राहू काळ दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल.
ग्रहांच्या हालचालींनुसार तसेच, अनेक शुभ योगाबरोबरच आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. आज चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा आणि दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा असं सांगितलं जातं. आजच्या दिवशी जुळून येणारा गुरुपुष्यामृत योग सर्व 12 राशींसाठी कसा ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला जाईल. फक्त आज तुमचं मन जरा चंचल असेल. कोणत्याही एका गोष्टीवर तुमचं मत स्थिर नसणार. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल. तसेच, मित्रांबरोबर कोणतेच वाद घालू नका.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही विनाकारण कोणावर विश्वास ठेवू नका. तसेच, कोणाकडून अपेक्षाही ठेवू नका. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनी आज सतर्क असण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच, दीर्घकालीन आजारांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभकारक असणरा आहे. आज कोणत्याही अनोळखी लोकांशी व्यवहार करु नका. तसेच, आज तुम्ही कौटुंबिक व्यवहारात कमाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
कन्या रास
कन्या राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही कोणावरही विनाकारण रागवू नका. तसेच, कोणाचं मन दुखवू नका.
तूळ रास
तूळ राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या अहंकाराला खतपाणी घालू नका. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, तुम्ही तुमची मौल्यवान वस्तू जपून ठेवा.
धनु रास
धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हालाजोडीदाराची उत्तम साथ मिळेल.अधिकारी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळेल.
मकर रास
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, वडिलांचा सल्ला तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा असेल. आज तुम्हाला कौटुंबिक समस्या जाणवू शकतात.आज दिवसभर वातावरण खेळीमेळीचं असणार आहे.
मीन रास
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मानसिक शांतता लाभेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा दिवस चांगला जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :