Grah Gochar 2025 : 10, 20 नाही तर तब्बल 500 वर्षांनी होणार ग्रहांचा 'महासंयोग'; शनीची वक्री तर गुरुच्या उदयाने 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु
Grah Gochar 2025 : जुलै महिन्यात म्हणजेच 14 जुलै रोजी गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. तर, शनी 13 जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे.

Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचं संक्रमण होणं ही एक नियमित प्रक्रिया आहे. प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होतो. आजा तब्बल 500 वर्षांनी ग्रहांचा महासंयोग जुळून येणार आहे. त्यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे.
जुलै महिन्यात म्हणजेच 14 जुलै रोजी गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. तर, शनी 13 जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे या दरम्यान कोणत्या राशी भाग्यशाली आहेत ते जाणून घेऊयात.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी गुरु ग्रहाचा उदय आणि शनीची वक्री फार अनुकूल ठरणार आहे. या महासंयोगामुळे रियल इस्टेट, प्रॉपर्टी आणि जमिनीशी संबंधित लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळेल. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. या काळात भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला लाभ मिळेल. तरुणांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या संयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अनेक बदल घडून येतील. तसेच, विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगली उंची गाठाल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
500 वर्षानंतर जुळून आलेल्या या महासंयोगामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. समाजातील नवीन लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, जे लोक बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















