Gemini Horoscope Today 7 May 2023 : व्यवहार करताना सतर्क राहा, रागावर नियंत्रण ठेवा; 'असा' आहे मिथुन राशीचा आजचा दिवस
Gemini Horoscope Today 7 May 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक कामात किंचित चढ-उताराचा दिवस असेल.
Gemini Horoscope Today 7 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज व्यवसायाशी (Business) संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. मित्राच्या मदतीने नोकरीच्या (Job) संधी मिळू शकतात. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. आज काही लोक तुम्हाला चुकीचे काम करण्यास प्रवृत्त करतील पण तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नका. रखडलेली कामे पूर्ण झाल्यावर मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. वैवाहिक जीवनात (Married Life) सहकार्याची भावना राहील. एकमेकांच्या सल्ल्याने काम कराल. आज बाहेर फिरायला जाण्याचाही बेत होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. दिलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण कराल.घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील.
व्यवहार करताना सतर्क राहा
करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक कामात किंचित चढ-उताराचा दिवस असेल. आज रविवार असल्यामुळे तुमचे काम हलके होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पैसा जपून वापरा. व्यवसायात किंचित नुकसान झाल्याने तुमच्यावर ताण येऊ शकतो. काही किरकोळ नुकसान देखील होऊ शकते. नोकरी व्यवसायात कर्मचाऱ्याच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागूशकते. त्यामुळे व्यवहार करताना सतर्क राहा.
मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात पती-पत्नीच्या नात्यामध्ये चांगला व्यवहार राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. आज कुटुंबियांबरोबर कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखा.
मिथुन राशीचे आजचे आरोग्य
डोळ्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका, अन्यथा तुमच्या चष्म्याची संख्या वाढू शकते. लॅपटॉपचे काम टाळा आणि फोनकडे जास्त पाहू नका.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर ठरेल. आज पिवळे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. कपाळावर हळदीचा टिळा लावावा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :