एक्स्प्लोर

Gauri Pujan 2024 Wishes : गौरी पूजनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा गौराईला नमन, पाठवा 'हे' संदेश

Jyeshtha Gauri Pujan 2024 Wishes : भाद्रपदात गणपती पाठोपाठ गौरीचं आगमन होतं. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Gauri Pujan Wishes In Marathi : गणेशोत्सव काळात गणपतीसोबत गौराईचा सण देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा गौराईचं आगमन हे 10 सप्टेंबरला झालं आहे, तर बुधवारी 11 सप्टेंबरला गौराईचं पूजन केलं जाईल. तसेच 12 सप्टेंबरला गौरी आणि गणपतीचं विसर्जन करण्यात येईल.

महाराष्ट्रातील प्रत्येक भागात गौरीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं. तसेच प्रत्येक प्रांतात गौरी आवाहन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. तुम्ही गौरी पूजनाच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश (Gauri Pujan Wishes In Marathi) पाठवू शकता आणि दिवसाचा गोडवा वाढू शकता. सोशल मीडिया स्टेटसला देखील तुम्ही हे संदेश ठेवू शकता.

गौरी पूजन शुभेच्छा संदेश (Gauri Pujan Wishes In Marathi)

गवर गौरी गं गौरी गं,
झिम्मा-फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

ज्येष्ठ गौरी पूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गौराई तुमच्या घरी सुख-समृद्धी घेऊन येवो!

आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख-समृद्धी,
गौरी आवाहनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवघी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गौरी माते, नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
हेच मागणं मागते तुला
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

घागर घुमूदे घुमूदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंब-लोण करा
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवासह गौरीची
जय जय गौराई..
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई!

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!

सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई,
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया,
घरा दारा लाभो आशीर्वादाची छाया
गौरी पूजनाच्या शुभेच्छा !

हेही वाचा:

Gauri Pujan 2024 : उद्या गौरी पूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget