Garuda Purana : रोज अंघोळ न करणाऱ्यांना म्हणतात 'पापी', गरुड पुराणानुसार त्यांना मिळते 'ही' शिक्षा
Garuda Purana : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणानुसार दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते आणि स्नान करताना नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
![Garuda Purana : रोज अंघोळ न करणाऱ्यांना म्हणतात 'पापी', गरुड पुराणानुसार त्यांना मिळते 'ही' शिक्षा Garuda Purana niti granth do not bath daily know what about punishment astrology marathi news Garuda Purana : रोज अंघोळ न करणाऱ्यांना म्हणतात 'पापी', गरुड पुराणानुसार त्यांना मिळते 'ही' शिक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/61cca3de02dd918466bd7b2b682399e21671414818707381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Garuda Purana : चांगल्या आरोग्यासाठी (Health) आपण आपली दिनचर्या योग्य प्रकारे पाळणे आवश्यक आहे. या नित्यक्रमात अंघोळ (Bath) करण्याचेही महत्वाचे काम असते. उन्हाळ्यात, बहुतेक लोक दररोज अंघोळ करतात, परंतु हिवाळ्यात अनेकवेळा लोक दररोज अंघोळ करणे टाळतात. हिवाळ्यात, अनेक लोक आळशीपणामुळे तसेच अति थंडीमुळे आंघोळ करत नाहीत. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गरुड पुराणानुसार (Garud Puran) दररोज स्नान केल्याने दैवी ज्ञान प्राप्त होते. पुराणानुसार नेहमी स्वच्छ पाण्यानेच स्नान करावे. कारण रोज सकाळी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.
धार्मिक कार्यापूर्वी स्नान करावे
विद्वानांचे असे मत आहे की, जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा तोंडातून लाळ गळते, त्यामुळे शरीर अशुद्ध होते, त्यामुळे सकाळी उठल्यावर स्नान केले पाहिजे. विशेषत: जेव्हा तुम्ही कोणतेही धार्मिक कार्य सुरू करण्यासाठी जाता, तेव्हा ते अधिक आवश्यक होते. पुराणात असे सांगितले आहे की, जेव्हाही पूजा करा, तेव्हा सर्व प्रथम स्नान करा, अन्यथा धार्मिक कार्याचे चांगले फळ मिळत नाही. आंघोळ न करता असे कोणतेही काम केल्यास तुम्हाला पापाचे भागीदार होऊन जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
रोज अंघोळ न केल्याने कामात येतो अडथळा
गरुड पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने दररोज स्नान केले नाही तर नकारात्मक शक्ती त्याच्याकडे आकर्षित होतात, धार्मिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जिला गरिबीची देवी मानले जाते. जो व्यक्ती रोज आंघोळ करत नाही, त्याच्या घरात रोज संकटे येतात आणि पैशाअभावी त्याचे आयुष्य निघून जाते. गरुड पुराणात अशा लोकांना पापींचा दर्जा देण्यात आला आहे आणि संकटांनी भरलेले जीवन त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेसारखे बनते.
अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध
गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक रोज सकाळी स्नान करत नाहीत, जाणूनबुजून किंवा नकळत त्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. कारण जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मकता असते. गरुड पुराणात अलक्ष्मी आणि कालकर्णी यांचे वर्णन वाईट शक्ती म्हणून केले आहे. या दोघांचा वास तिथे असतो. धर्म पुराणात अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची बहीण म्हटले आहे. पण अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि अलक्ष्मीला गरिबीची देवी मानली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)