एक्स्प्लोर
Advertisement
Garud Puran : 'ही' 7 कामं कराल तर थेट नरकात जाल; गरुड पुराणात दडलंय गुपित
Garud Puran : गरुड पुराणात व्यक्तीला त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब कसा चुकवावा लागतो, कर्मानुसार नरकात कशी शिक्षा मिळते, तर चांगल्या कर्माने स्वर्गात कोणतं स्थान मिळतं या संदर्भात सांगण्यात आलं आहे.
Garud Puran : गरुड पुराणाला (Garud Puran) हिंदू धर्मात महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये व्यक्तीचं आयुष्य आणि मृत्यूच्या नंतरचा प्रवास नेमका कसा असतो या संदर्भात सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर व्यक्तीला त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब कसा चुकवावा लागतो, कर्मानुसार नरकात कशी शिक्षा मिळते, तर चांगल्या कर्माने स्वर्गात कोणतं स्थान मिळतं या संदर्भात सांगण्यात आलं आहे. चला तर जाणून घेऊयात गरुड पुराणात कोणत्या कामाला सर्वात वाईट आणि महापाप मानण्यात आलं आहे ते पाहूयात.
'या' लोकांना नरकात मिळतं स्थान
- जे लोक महिलांवर वाईट नजर ठेवतात, वाईट कर्म करतात, तसेच मुलींचा छळ करणारे लोक महापापी असतात. या कर्मांना गरुड पुराणात महापापाचा दर्जा देण्यात आला आहे. अशा लोकांना जिवंतपणीच अनेक कष्ट सोसावी लागतात. त्याचबरोबर मरणानंतरही त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. नरकातही त्यांना भयंकर शिक्षा मिळते.
- लहान मुलं, ज्येष्ठ व्यक्तींना त्रास देणारे तसेच, महिलांचा अपमान करणाऱ्या लोकांना नरकात स्थान मिळतं.
- गरुड पुराणात भ्रूण हत्या करणाऱ्या लोकांना महापापी मानण्यात आलं आहे. तसेच, जे लोक मुलींना गर्भात मारण्याचं पाप करतात असे लोक पुढच्या जन्मात नपुसकलिंगी होतात. त्याचबरोबर नरकात यमदूताकडून यांना कठोर शिक्षा मिळते.
- जे लोक चोरीमाऱ्या करतात, दुसऱ्यांचे पैसे लुटतात अशा लोकांची संपत्ती काही काळातच नष्ट होते. त्याचबरोबर त्यांना कठोर दंडाची शिक्षा मिळते.
- जे लोक निष्पाप जीव-जंतूंचा बळी घेतात, त्यांची हत्या करतात अशा लोकांना नरकात कठोर शिक्षा मिळते. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे, कधीच निष्पाप प्राण्याला त्रास देऊ नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Gochar 2024 : वर्षाच्या शेवटी शनीची बदलतेय चाल; 27 डिसेंबरपासून 'या' 3 राशींवर नसणार शनीचं सावट, हातातून गेलेला पैसा पुन्हा येणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement