(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gajlaxmi Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर गुरु आणि शुक्राच्या युतीने जुळून आलाय गजलक्ष्मी राजयोग; आता 'या' 3 राशींचे सुरु होतील 'अच्छे दिन'
Gajlaxmi Rajyog : गुरु आणि शुक्र ग्रहांच्या एकत्र येण्याने हा शुभ योग जुळून आला आहे. या कालावधीत वृषभ राशीत शुक्र आणि गुरु ग्रहांची युती झाली आहे.
Gajlaxmi Rajyog : ज्योतिषशास्त्रात असे अनेक शुभ योग (Yog) सांगण्यात आले आहेत जे व्यक्तीसाठी फार फलदायी आहेत. यापैकीच एक शुभ योग आज जुळून आलाय तो म्हणजे गजलक्ष्मी राजयोग (Gajlaxmi Rajyog). गुरु आणि शुक्र ग्रहांच्या एकत्र येण्याने हा शुभ योग जुळून आला आहे. या कालावधीत वृषभ राशीत शुक्र आणि गुरु ग्रहांची युती झाली आहे.
वृषभ राशीत (Taurus Horoscope) शुक्र आणि गुरु ग्रहाची युती तब्ब्ल 12 वर्षांनंतर झाली आहे. हा राजयोग काही राशींसाठी फार लाभदायक ठरणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग फार चांगला ठरणार आहे. या राशीच्या लोकांवर लक्ष्मीदेवीची सदैव कृपा असणार आहे. या राजयोगाच्या शुभ प्रभावाने तुमच्य धन-संपत्तीत चांगलीच वाढ होणार आहे. तसेच, या राशींची वाईट परिस्थिती दूर होऊन त्यांना चांगले दिवस येतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील या राजयोगाचा परिणाम तुम्हाला दिसून येईल.
तसेच, गुरुच्या कृपेने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि शुक्राच्या साथीने तुम्हाला अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. तुमच्या पदोन्नतीत वाढ होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
गुरु आणि शुक्राच्या युतीने कर्क राशीच्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे. या शुभयोगाने तुमची आर्थिक परिस्थिती पू्र्वीपेक्षा अधिक चांगली राहील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील. अनेक दिवसांपासून रखडलेलं तुमचं काम पूर्ण होईल. तसेच, या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल.
या राशीचे लोक आज पूर्ण श्रद्धेने काम करतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, ऑफिसमदध्ये तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. शुक्र ग्रहाच्या साथीने तुमचं प्रमे जीवन अधिक बहरेल. तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
गजलक्ष्मी राजयोगाच्या संयोगाने धनु राशीच्या लोकांच्या सौभाग्यात वाढ होईल. तुमचा कल हा यशाच्या दृष्टीने राहील. काही जुने वादविवाद असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक चणचण दूर होईल. तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. या शुभ योगाच्या साथीने तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता.
धनु राशीसाठी हा राजयोग प्रमोशन देखील मिळवू शकतो. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध मजबूत होतील. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :