(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Feng Shui Wallet Tips : मुल्यांकानुसार ठेवा पर्सचा रंग , पैशांचा पाऊस पडेल
Feng Shui Wallet Tips : पैशाच्या कमतरतेमुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही पैशांशी संबंधित समस्या असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की याचे सर्वात मोठे कारण आहे तुमची पर्स.
Feng Shui Wallet Tips : माणूस पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत कर असतो. पण काहींजवळ पैसा टिकत नाही. या पैशाच्या कमतरतेमुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही पैशांशी संबंधित समस्या असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की याचे सर्वात मोठे कारण आहे तुमची पर्स. होय, ही पर्स आहे जी तुमचे पैसे टिकू देत नाही. कारण तुमचे नशीब पर्सशी निगडीत असते. फेंगशुईनुसार तुम्ही कोणत्या रंगाची पर्स तुमच्यासोबत ठेवावी हे महत्त्वाचे ठरते.
मुल्यांक एक
या मुल्यांकाच्या लोकांनी लाल रंगाची पर्स सोबत ठेवावी. यासोबत तांब्याचे नाणे ठेवावे.
मुल्यांक दोन
तुम्ही तुमच्यासोबत पांढरी पर्स ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे देखील ठेवा.
मुल्यांक तीन
या मुल्यांकाच्या लोकांनी पिवळ्या किंवा मेहंदी रंगाची पर्स ठेवावी. तसेच पर्समध्ये सोनेरी फॉइलचा त्रिकोणी तुकडा ठेवावा.
मुल्यांक चार
आकाशी निळ्या रंगाची पर्स सोबत ठेवावी. याशिवाय पर्समध्ये हिरवा रुमाल किंवा छोटे कापड ठेवा.
मुल्यांक पाच
या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाची पर्स सोबत ठेवावी. पर्समध्ये मनी प्लांटचे एक पान ठेवा.
मुल्यांक सहा
जर तुमचा भाग्यशाली अंक 6 असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची पर्स ठेवावी. यासोबतच पर्समध्ये पितळेचे नाणे ठेवा.
मुल्यांक सात
या मूलांकाच्या लोकांनी बहुरंगी पर्स सोबत ठेवावी आणि पर्समध्ये माशाचा फोटोही ठेवावा. असे केल्याने त्यांना फायदा होईल.
मुल्यांक आठ
या राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची पर्स सोबत ठेवावी. याशिवाय पर्समध्ये निळा रुमाल आणि मोराचा फोटो ठेवा.
मुल्यांक नऊ
जर तुमचा मूलांक नऊ असेल तर तुम्ही केशरी किंवा निळ्या रंगाची पर्स ठेवावी. तसेच पर्समध्ये पितळेचे नाणे ठेवण्यास विसरू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :