February Festival List 2025: माघी गणेश जयंती ते महाशिवरात्रीपर्यंत, फेब्रुवारी महिन्यातील सण, उपवास, महत्त्वांच्या दिवसाची यादी जाणून घ्या..
February Festival List 2025: फेब्रुवारी हा महिना धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि व्रत असणार आहेत, संपूर्ण यादी येथे वाचा.

February Festival List 2025: फेब्रुवारी हा महिना धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हिंदू धर्मानुसार या महिन्यात अनेक मोठे उपवास आणि सण आहेत. तर प्रेमी-युगुलांकडून फेब्रुवारी महिन्याला रोमँटिक महिना देखील म्हटले जाते. माघी गणेश जयंती ते महाशिवरात्री, वसंत पंचमीपर्यंत प्रत्येक प्रमुख व्रत आणि सणांची यादी नोट करून ठेवा.
दोन टप्प्यात पंचकही
फेब्रुवारी महिना हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सण आणि उपवासांसाठी ओळखला जातो. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी ते महाशिवरात्रीपर्यंत अनेक धार्मिक विधी केले जाणार आहेत. या महिन्यात दोन टप्प्यात पंचक होणार आहे, त्याशिवाय या महिन्यात गुप्त नवरात्रीचीही समाप्ती होणार आहे. 28 दिवसांच्या या महिन्यात किती उपवास आणि सणहोणार आहेत याची हे जाणून घ्या. तुमच्याकडे आगामी शुभ दिवसांची आगाऊ माहिती असल्यास, तुम्ही त्या दिवसाची पूर्वतयारी करू शकाल.
फेब्रुवारी 2025 च्या उपवास आणि सणांची यादी
- गणेश जयंती, विनायक चतुर्थी, माघी गणेशोत्सव - 1 फेब्रुवारी 2025, शनिवार
- वसंत पंचमी- 2 फेब्रुवारी 2025, रविवार
- रथ सप्तमी- 4 फेब्रुवारी 2025, मंगळवार
- भीष्म अष्टमी, मासिक दुर्गाष्टमी – 5 फेब्रुवारी 2025, बुधवार
- जया एकादशी- 8 फेब्रुवारी 2025, शनिवार
- भीष्म द्वादशी- 9 फेब्रुवारी 2025, रविवार
- श्री विश्वकर्मा जयंती- प्रदोष व्रत- 10 फेब्रुवारी 2025, रविवार
- पारशी मेहेर मासारंभ - 11 फेब्रुवारी 2025, मंगळवार
- माघ पौर्णिमा, गुरु रविदास जयंती - 12 फेब्रुवारी 2025, बुधवार
- गुरूप्रतिपदा- 13 फेब्रुवारी 2025, गुरुवार
- व्हॅलेंटाईन डे, शब्बे बारात - 14 फेब्रुवारी 2025, शुक्रवार (ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये निश्चित दिवस)
- संकष्टी चतुर्थी- 16 फेब्रुवारी 2025, रविवार (चंद्रोदय - 09.49)
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)- 19 फेब्रुवारी 2025, बुधवार
- कालाष्टमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन- 20 फेब्रुवारी 2025, गुरुवार
- महर्षि दयानंद सरस्वती जयंती, संत गाडगे महाराज जयंती- 23 फेब्रुवारी 2025, रविवार
- विजया एकादशी- 24 फेब्रुवारी 2025, सोमवार
- प्रदोष व्रत- 25 फेब्रुवारी 2025, मंगळवार
- महाशिवरात्री- 26 फेब्रुवारी 2025, बुधवार
- दर्श अमावस्या, मराठी भाषा गौरव दिन- 27 फेब्रुवारी 2025, गुरुवार
- फाल्गुन मासारंभ- 28 फेब्रुवारी 2025, गुरुवार
हेही वाचा>>>
Astrology: ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये 'या' 5 राशी एक्सपर्ट! तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकीच आहात का? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















