धन-संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी करा करा 'हे' साधे उपाय
Astro News : असे मानले जाते की, भाकरीशी संबंधित या युक्त्या माणसाच्या समस्या दूर करतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात. भाकरीचा एक तुकडाही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवू शकतो.
Astro News : आजही अनेक लोक ज्योतिष शास्त्रा पाहून आपली महत्वाची कामे करतात. त्यामुळे जोतिष शास्त्राला खूप महत्व आहे. यात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचा उपयोग ग्रहांना शांत आणि बलवान करण्यासाठी केला जातो. भाकरीशी संबंधित युक्त्या आणि ज्योतिषीय उपाय विशेष लाभ देतात. धन आणि यश मिळविण्यासाठी त्यांचा उपयोग खूप फलदायी आहे.
असे मानले जाते की, भाकरीशी संबंधित या युक्त्या माणसाच्या समस्या दूर करतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात. भाकरीचा एक तुकडाही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवू शकतो. भाकरीचे हे उपाय राहू-केतूचे दोषही शांत करतात. असे केल्याने घरात सुख-शांती नांदते. चला जाणून घेऊया भाकरीशी संबंधित या खास युक्त्या आणि उपाय.
Astro News : चमत्कारिक युक्त्या
कुंडलीत राहूची स्थिती खराब असेल किंवा राहु दोष असेल तर तो दूर करण्यासाठी भाकरीचा उपाय प्रभावी ठरतो. ताज्या किंवा शिळ्या भाकरीवर मोहरीचे तेल लावा आणि काळ्या कुत्र्याला खायला द्या. असे सतत 15 दिवस केल्याने राहु दोष दूर होतो.
कुंडलीत पितृदोष असल्यास अमावस्येच्या दिवशी दोन भाकरी व तांदळाची खीर करावी. भाकरीमध्ये खीर घालून कावळ्यांना खायला द्या. यामुळे पितृ दोषापासून मुक्ती मिळेल.
घरात अनेकदा भांडणाचे वातावरण असते, त्यामुळे ते घरातील बिघडलेले वातावरण दुरूस्त करण्यासाठी स्वयंपाक करताना कुत्र्यासाठी पहिली भाकरी बनवा. असे केल्याने कुटुंबातील वातावरण चांगले राहते.
जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर भाकरीमध्ये साखर टाकून मुंग्यांना खायला द्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
जेवणाआधी पहिली भाकरी गाईच्या नावाने काढून घ्या आणि तिला खायला घाला. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते. ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तीन प्रकारची कच्ची मसूर रोटीमध्ये ठेवा आणि गायीला खाऊ घाला. याबरोबरच माशांना भाकरीचे तुकडे खाऊ घातल्याने प्रगती होते आणि घरात सुख-समृद्धी येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Chanakya Niti : यश मिळवण्यासाठी तुम्हाला 'या' कडू झाडाची दोन फळे चाखायला लागतील, चाणक्यनीती मध्ये काय म्हटलंय...