Diwali Padwa 2024 Gifts : दिवाळी पाडव्याला लाडक्या बायकोला द्या 'या' खास भेटवस्तू; पाहा राशीनुसार बेस्ट ऑप्शन्स
Diwali Padwa 2024 Gifts : दिवाळी पाडव्याचा हा दिवस पती-पत्नीसाठी फार खास असतो. पत्नी तर या दिवसाची आवर्जून वाट पाहतात.
Diwali Padwa 2024 Gifts : आज दिवाळी पाडव्याचा (Diwali Padwa) दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. तसेच, दिवाळी पाडव्याचा हा दिवस पती-पत्नीसाठी फार खास असतो. पत्नी तर या दिवसाची आवर्जून वाट पाहतात. कारण या दिवशी पत्नीला आपल्या पतीकडून खास भेटवस्तू मिळतात. त्यामुळेच, यंदाच्या दिवाळी पाडव्याला तुम्ही तुमच्या पत्नीला राशीनुसार कोणत्या भेटवस्तू (Gifts) देऊ शकता याची काही ऑप्शन्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.
बायकोला राशीनुसार द्या 'या' खास भेटवस्तू
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीला बायकोला तुम्ही लाल रंगाची भेटवस्तू देऊ शकता. यामध्ये तुम्ही लाल रंगाचा ड्रेस किंवा साडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या बायकोला तुम्ही परफ्युम किंवा मेकअपचं साहित्य भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन रास असणाऱ्या बायकोला तुम्ही पैसे भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
ज्यांची रास कर्क आहे अशा राशीच्या बायकोला तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे तसेच, चांदीची कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या बायकोला तांब्याची तसेच पितळेची वस्तू दिल्यास घरात सुख-समृद्धी वाढेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या बायकोला हिरवा रंग फार प्रिय आहे. अशा वेळी तुम्ही हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू पाडव्याला भेट देऊ शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या बायकोला तुम्ही दागिने भेट म्हणून देऊ शकता.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या बायकोला तुम्ही तांब्यापासून बनविलेल्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
धनु रास (Sagittarius Horoscope)
पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पितळेची वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
तुम्ही मकर राशीच्या बायकोला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू गिफ्ट्स म्हणून देऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या बायकोला तुम्ही निळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन रास रास असलेल्या बायकोला तुम्ही केशरी तसेच पिवळ्या रंगाचा ड्रेस भेट म्हणून देऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :